IMPIMP

PI To DySP/ACP Promotion | लवकरच 175 पोलीस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती

by nagesh
PI To DySP/ACP Promotion | 175 police inspectors from thane mumbai navi mumbai police force and some other districts have finally been promoted

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   PI To DySP/ACP Promotion | मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातील 175 पोलीस निरीक्षकांना (Police Inspector) पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकांची उपाधीक्षक किंवा सहायक पोलीस आयुक्त या पदावर (PI To DySP/ACP Promotion) वर्णी लागणार आहे. त्यामुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या अनेक पोलीस निरीक्षकांना बढती मिळणार आहे. हे अधिकारी वर्षभरापासून पदोन्नतीच्या प्रतिक्षेत होते.

 

मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad), पुणे (Pune), नाशिक (Nashik), औरंगाबाद (Aurangabad), नागपूर (Nagpur) आणि अमरावती (Amravati) येथील 1991 ते 93 या बॅचचे सुमारे 175 पोलीस अधिकारी हे सरळसेवा भरतीने पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून भरती झाले होते. त्यानंतर 10 ते 15 वर्षानंतर या अधिकाऱ्यांनी विविध पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून बढती देण्यात आली. नियमानुसार, पोलीस निरीक्षक म्हणून 10 वर्षे कालावधी पूर्ण केल्यानंतर बढती मिळून त्यांची सहायक पोलीस आयुक्त किंवा उपाधीक्षक पदी पदोन्नती (PI To DySP/ACP Promotion) करणे आवश्यक होते. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे हे अधिकारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्षात (Control Room) त्यांना पोलीस निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्याचे कामकाज पाहण्याची वेळ आली होती.
विशेष म्हणजे, या पोलीस अधिकाऱ्यांना सहायक पोलीस आयुक्तपदावर असलेल्या अधिकाऱ्याचे वेतन मिळत आहे.
याबाबत काही पोलीस अधिकाऱ्यांनी गृहविभागाकडे पाठपुरावा केला आहे.
यामुळे दोन महिन्यांपूर्वी विभागीय पदोन्नती समितीने पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांच्या नावाची यादी गृह विभागाला दिली होती.

 

गृह विभागाने (Home Department) बुधवारी या 175 अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली
असून लवकरच त्यांना सहायक पोलीस आयुक्त किंवा उपाधिक्षक पदाचा कार्यभार स्विकारता येणार आहे.
पोलीस दलातून निवृत्त होण्यापूर्वी सहायक पोलीस आयुक्त किंवा उपधीक्षक म्हणून काम करावे,
अशी इच्छा असणाऱ्या अधिकाऱ्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे.

 

Web Title :- PI To DySP/ACP Promotion | 175 police inspectors from thane mumbai navi mumbai police force and some other districts have finally been promoted

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | आगामी निवडणुकीत आघाडीची वाट पाहात बसू नका, एकटे लढण्याची तयारी करा; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सूचक सल्ला

Sushma Andhare | अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनावरुन सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या- ‘सरकार उलथवून टाकण्यासाठीच…’

Pune Crime | वीज खंडीत करण्याची भिती दाखवून महिलेला घातला 1 लाखांचा गंडा, बाणेर येथील घटना

 

Related Posts