IMPIMP

Pune Crime | वीज खंडीत करण्याची भिती दाखवून महिलेला घातला 1 लाखांचा गंडा, बाणेर येथील घटना

by nagesh
Pune Cyber Crime | 27 lakhs was charged to an IT youth for a loan of 40 lakhs

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन Pune Crime | महावितरणमधून (MSEDCL) बोलत असल्याचे सांगून वीज बिल भरले नसल्याने वीज कट करण्याची
भिती दाखवून सायबर चोरट्यांनी (Cyber Crime) एका महिलेला १ लाख रुपयांना गंडा घातला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी बाणेर येथील एका ५७ वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४७५/२२) दिली
आहे. हा प्रकार २ नोव्हेबरला साडेनऊ वाजता घडला होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका मोबाईलवरुन फोन करुन महावितरणमधून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना तुम्ही वीज बिल भरले नसल्याने तुमचे लाईट कनेक्शन रात्री साडेनऊ पर्यंत तोडण्यात येईल, असे सांगितले. पैसे भरण्यासाठी फिर्यादी यांना टीम व्हुअर अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर मोबाईलचे कॅलक्युलेटरवर फिर्यादी यांना त्यांच्या बँकेचा एटीएमचा पिन टाकण्यास सांगितले.
त्यांनी पिन नंबर टाकताच फिर्यादीच्या बँक खात्यातून १ लाख १ हजार १९१ रुपये ट्रान्सफर करुन फसवणुक (Fraud Case) करण्यात आली.

 

पोलीस उपनिरीक्षक चाळके (Sub-Inspector of Police Chalke) अधिक तपास करीत आहेत.
महावितरणाच्या नावाने होणार्‍या फसवणुकीपासून सावधान महावितरणकडून कोणीही कधी बिल भरण्यासाठी फोन करुन कळविले जात नाही.
तसेच कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जात नाही. सायबर चोरट्यांच्या अशा फसवणुकीला (Cheating Case) कोणी भुलू नये.
कोणत्याही कॉलला प्रतिसाद देण्यापूर्वी महावितरणच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | An incident in Baner where a woman was extorted Rs 1 lakh for fear of power cut

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 5 पट पैसे परत केल्यानंतरही घरात शिरुन धमकाविणारा सावकार नागराज उर्फ नागेश नायकोडी अटकेत

Indrani Balan Foundation | भारतीय लष्कर व इंद्राणी बालन फाऊंडेशच्या ‘डॅगर परिवार स्कूल’चा वर्धापन दिन उत्साहात साजरा; काश्मीरमधील बारामुल्ला येथे कार्यक्रम संपन्न

Retired Addl Collector R.L. Gagrani Arrested | सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी आर.एल. गगराणी यांना पुण्यातून अटक, नांदेड अ‍ॅन्टीकरप्शनची कारवाई; गगराणींसह त्यांची पत्नी व मुलाविरूध्द अपसंपदेचा गुन्हा

 

Related Posts