IMPIMP

Pimpri Chinchwad Fire News | पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीत शॉर्ट सर्किट; चार्जिंगला लावलेल्या 15 इलेक्ट्रिक गाड्या जळून खाक

by nagesh
Pimpri Chinchwad Fire News | 15 electric bikes burnt due to short circuit in triveni society of pimpri chinchwad pune fire news

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Fire News) परिसरातील एका सोसायटीमध्ये शॉर्ट सर्किट झाले. यावेळी चार्चिंगसाठी लावलेल्या 15 इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. शहरातील तळवडे भागात त्रिवेणी हौसिंग सोसायटी येथे हा प्रकार घडला आहे. यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही, पण 15 दुचाकी जळाल्या आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. तसेच, या आगीत पहिल्या मजल्यावरील चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात जवानांना यश आले आहे. इमारतीच्या खाली पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक बाइक्स चार्जिंगला लावल्या होत्या, तेथे शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांकडून सांगण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अग्निशामन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड शहरातील त्रिवेणी नगर येथे
त्रिवेणी हौसिंग सोसायटी या ठिकाणी एका इमारतीच्या पार्किंगमध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि चार्चिंगला
लावलेल्या 15 मोटारसायकल जळाल्या. ही घटना रविवारी रात्री दीडच्या सुमारास घडली.
यानंतर अग्निशमन विभागाला ही माहिती मिळताच जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत,
आगीवर नियंत्रण मिळवत पहिल्या मजल्यावर अडकलेल्या 4 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. त्यामध्ये तीन मुलांसह 55 वर्षीय पौढाचा समावेश आहे. अग्निशमन विभागाचे मुकेश बर्वे, प्रतीक कांबळे, प्रदीप हिले, गोविंद सरवदे, दिनेश इंगलकर, अशोक पिंपरे यांसह इतर कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.

 

 

Web Title :- Pimpri Chinchwad Fire News | 15 electric bikes burnt due to short circuit in triveni society of pimpri chinchwad pune fire news

 

हे देखील वाचा :

Pune Congress | सोनिया गांधी यांचा वाढदिवस वृद्धांसोबत केक कापून साजरा

PM Kisan | PM किसानच्या १३ व्या हप्त्यापूर्वी मोठी अपडेट, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती

Ajit Pawar | शाई फेकली म्हणून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांवर अद्याप गुन्हा का नाही? – अजित पवार

Pune Crime | पुण्यातील हिंगणे परिसरातील निरज ढवळे व त्याच्या 7 साथीदारांवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 113 वी कारवाई

 

Related Posts