IMPIMP

PM Kisan | PM किसानच्या १३ व्या हप्त्यापूर्वी मोठी अपडेट, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती

by nagesh
PM Kisan | pm kisan narendra singh tomar says 8 42 cr farmers paid pm kisan instalment in aug nov

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | तुम्हीही पीएम किसान सन्मान निधीच्या १३व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सरकारच्या या योजनेशी संबंधित मोठी आणि महत्त्वाची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या वतीने राज्यसभेत देण्यात आली आहे. कृषिमंत्र्यांनी सांगितले की, ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या पीएम किसानच्या १२ व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या ८.४२ कोटी झाली आहे. सरकारने या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे वर्ग केले आहेत. एका प्रश्नाच्या उत्तरात कृषिमंत्र्यांनी संसदेत ही माहिती दिली. ११व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या १०.४५ कोटी होती आणि १२ व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या थेट ८.४२ कोटीवर आली आहे, म्हणजेच पीएम किसानचे लाभार्थी कमी झाले आहेत. (PM Kisan)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

२-२ हजार रुपयांचे तीन हप्ते देण्याची तरतूद

सरकारच्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक आधारावर ६००० रुपये दिले जातात. योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीनदा २-२ हजार रुपये देण्याची तरतूद आहे. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात, कृषिमंत्र्यांनी वरिष्ठ सभागृहाला सांगितले की, एप्रिल-जुलै २०२२ या कालावधीत लाभार्थींची संख्या १०.४५ कोटींवर पोहोचली आहे. त्यावेळी योजनेचा ११ वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना अदा करण्यात आला. (PM Kisan)

 

लाभार्थ्यांची संख्या झाली कमी

तोमर यांनी सांगितले की, पीएम किसान निधी योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्याच्या वेळी लाभार्थ्यांची संख्या ३.१६ कोटी होती. त्याच वेळी, १२ व्या हप्त्याच्या वेळी, हा आकडा ८.४२ कोटींवर पोहोचला. दुसऱ्या हप्त्यात लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ६ कोटी होती. तिसऱ्या कालावधीत ती वाढून ७.६६ कोटी झाली. आठव्या हप्त्यात ही संख्या वाढून ९.९७ कोटी, नवव्या हप्त्यात १०.३४ कोटी आणि ११व्या हप्त्यात १०.४५ कोटी झाली. ११व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या १०.४५ कोटी होती आणि १२ व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या थेट ८.४२ कोटीवर आली आहे, म्हणजेच पीएम किसानचे लाभार्थी कमी झाले आहेत.

 

शेतकरी १३व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत

आता देशभरातील शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या १३व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
सूत्रांचे म्हणणे आहे की सरकार १३ व्या हप्त्याच्या रूपात २००० रुपये जानेवारीमध्ये शेतकऱ्यांच्या
खात्यात हस्तांतरित करू शकते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू
केली आहे. सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- PM Kisan | pm kisan narendra singh tomar says 8 42 cr farmers paid pm kisan instalment in aug nov

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील हिंगणे परिसरातील निरज ढवळे व त्याच्या 7 साथीदारांवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 113 वी कारवाई

Anil Deshmukh | अनिल देशमुखांना जामीन, मात्र CBI च्या भूमिकेमुळे 10 दिवसांची स्थगिती

Jitendra Awhad | ‘शाईफेक करणार्‍यावर 307 चा गुन्हा योग्य नाही’ – जितेंद्र आव्हाड

 

Related Posts