IMPIMP

Pimpri Chinchwad Police | चंद्रकांत पाटलांच्या शाईफेक प्रकरणानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना केले ‘या’ विभागाशी संलग्न

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – Pimpri Chinchwad Police | राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शनिवारी (दि. 10) झालेल्या शाईफेकीनंतर रविवारी (दि. 11) पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना संलग्न करण्यात आले आहे. याबाबत रविवारी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (CP Ankush Shinde) यांनी आदेश दिले. पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांना विशेष शाखा एक येथे संलग्न केले गेले आहे, तर पिंपरी पोलीस ठाण्याचा प्रभार पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांच्याकडे दिला आहे. गुन्हे शाखा युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांना चिंचवड पोलीस ठाण्यात संलग्न केले आहे. चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना पिंपरी वाहतूक विभागात संलग्न केले आहे. प्रशासकीय व बंदोबस्ताच्या कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात या पोलीस अधिकाऱ्यांना संलग्न करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद केले गेले आहे. (Pimpri Chinchwad Police)

 

शनिवारी पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील एका खासगी कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून ते परतत असताना त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या शाईफेकीची जबाबदारी समता सैनिक दलाने घेतली आहे. समता सैनिक दलाचे मनोज भास्कर घरबाडे असे शाई फेकणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो आणि त्याचे अन्य दोन साथीदार सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpri Chinchwad Police)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चंद्रकांत पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी पैठणमधील एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले होते.
महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांसाठी शाळा काढल्या.
त्यावेळी त्यांना सरकारने अनुदाने दिले नव्हते. त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या.
त्यामुळे शाळा, महाविद्यालय काढण्यासाठी तुम्ही सरकारवर अवलंबून का राहता, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहे. त्याच रागातून त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती.

 

 

Web Title :- Pimpri Chinchwad Police | three senior police inspectors of pimpri chinchwad police dept attached to traffic branch after ink throw case chandrakant patil

 

हे देखील वाचा :

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीमधून वाइल्ड कार्ड एंट्री घेतलेल्या ‘या’ स्पर्धकाला घ्यावा लागला घराचा निरोप

Pune Crime | पत्नी अन् तिच्या कुटुंबाच्या त्रासाला वैतागून पतीची आत्महत्या; पत्नीसह चौघांवर FIR; मुंढवा परिसरातील घटना

Wardha Crime | धक्कादायक! वर्ध्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा संशयास्पद मृतदेह

 

Related Posts