IMPIMP

Wardha Crime | धक्कादायक! वर्ध्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा संशयास्पद मृतदेह

by nagesh
Wardha Crime | partially burnt body of woman was found in satyagrahi ghat wardha possibility of attack

वर्धा : सरकारसत्ता ऑनलाईन – Wardha Crime | वर्ध्यामध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगाव श्यामजीपंत पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सत्याग्रही घाटात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही मृत महिला नेमकी कोण आहे?, तिचा मृतदेह सत्याग्रही घाटात कसा आला? या सगळ्यांचा शोध तळेगाव पोलीस घेत आहेत. (Wardha Crime)

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
तळेगाव येथील रहिवासी असलेले भीमराव रमेश सिंगरे हे शनिवारी सरपण गोळा करण्यासाठी नागपूर-अमरावती मार्गावरील सत्याग्रही घाट या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी सरपण गोळा करीत असताना राष्ट्रीय महामार्गापासून सुमारे 300 फूट अंतरावर त्यांना एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यानंतर त्यांनी तातडीने गावातील नागरिकांना याची माहिती दिली. तसेच पोलिसांनादेखील याची कल्पना दिली. (Wardha Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी त्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन परिसराची बारकाईने पाहणी केली. यानंतर त्यांनी त्या महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. तळेगाव पोलिसांनी याप्रकरणी नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी तातडीने तळेगाव गाठून घटनास्थळाची पाहणी केली. लवकरच या प्रकारचा छडा लावू, असा विश्वास यावेळी पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title :- Wardha Crime | partially burnt body of woman was found in satyagrahi ghat wardha possibility of attack

 

हे देखील वाचा :

Pune Crime | हॉटेलमध्ये राडा घालत केली गाड्यांची तोडफोड; वारजे परिसरातील घटना

Palghar Crime | पालघरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या; पत्रकारितेचा कोर्सही केला होता

Pune Rickshaw Strike | आज पुन्हा रिक्षाचे आरटीओ कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलनाची हाक

 

Related Posts