IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 350 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | Pimpri Chinchwad's journey towards Corona free city, find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना (Pimpri Corona) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असताना ओमायक्रॉन व्हेरियंटने (Omycron Variant) चिंता वाढवली आहे. रुग्ण वाढत असल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 350 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 350 नवीन रुग्ण (Pimpri Corona) आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 79 हजार 922 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 29 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 75 हजार 322 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरामध्ये सध्या 805 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरात होम क्वारंटाईनमध्ये 572 तर संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 233 रुग्ण आहेत.
आज दिवसभरात शहरातील एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 12 हजार 148 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 30 लाख 01 हजार 447 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | Big increase in number of active patients in Pimpri Chinchwad! Diagnosis of 350 patients of Corona in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

DA DR Hike | सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावर प्रतिबंध लावल्याचे वृत्त? जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

Pune Metro | ‘वनाज ते गरवारे महाविद्यालय’ व ‘पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी’ या दोन मेट्रो जानेवारी अखेरीस धावणार

Pune Corona | अत्यंत चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1100 पेक्षा जास्त कोरोनाचे नवे रूग्ण आढळले, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts