IMPIMP

DA DR Hike | सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावर प्रतिबंध लावल्याचे वृत्त? जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

by nagesh
DA DR Hike | dearness allowance and dearness relief will kept in abeyance till july 2020 fake order is circulating

नवी दिल्ली : वृत्तसंस्था DA DR Hike | केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता (Dearness Allowance, DA) आणि महागाई मदतीवर (Dearness Relief, DR) कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध लावण्यात आलेला नाही. महागाई भत्ता आणि महागाई मदतीबाबत जारी केलेल्या बनावट आदेशात (Fake Order) केंद्र सरकारने हे भत्ते थांबवल्याचा दावा करण्यात येत आहे. (DA DR Hike)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

PIB ने केली आदेशाची पोलखोल

3 जानेवारीच्या या आदेशाची पोलखोल ‘पीआयबी फॅक्ट चेक’मध्ये करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना देय असलेला महागाई भत्ता आणि महागाई मदत स्थगित ठेवला जाईल.

 

 

सोशल मीडियात हा आदेश अर्थ मंत्रालयाचा (Finance Ministry) असल्याचे बोलले जात आहे. हे पत्र बनावट असल्याचे सिद्ध करण्यासाठी पत्रातील दुहेरी फाईल क्रमांक पुरेसे आहेत. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 1 जानेवारी 2022 पासून आणखी वाढ होणार आहे. (DA DR Hike)

 

अर्थ मंत्रालयाकडून कोणताही आदेश नाही

PIB ने ट्विट केले आहे की, ही ऑर्डर कॉपी बनावट आहे. असा कोणताही आदेश मंत्रालयाने जारी केलेला नाही. महामारीची तिसरी लाट पसरण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर डीए आणि डीआरवर प्रतिबंध घालण्यात येईल, असे बनावट आदेशात म्हटले आहे. 1 जानेवारी 2022 पासून मिळणारा महागाई भत्ता आणि महागाई सवलतीबाबत निर्णय नंतर घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जाणून घ्या काय आहे ऑर्डरमध्ये

ट्विटनुसार, हा आदेश केंद्रातील सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लागू असेल.
सर्व मंत्रालयांच्या वित्त विभागांनी या जादा खर्चाला आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलावीत.
या कालावधीत केवळ वाजवी खर्चाचा विचार केला जाईल.
महामारीमध्ये जिथे जिथे मदतीची गरज आहे.
तेथे विभागाने आपल्या कर्मचार्‍यांना मदतीसाठी पाठवावे.

 

Web Title :- DA DR Hike | dearness allowance and dearness relief will kept in abeyance till july 2020 fake order is circulating

 

हे देखील वाचा :

Pune Metro | ‘वनाज ते गरवारे महाविद्यालय’ व ‘पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी’ या दोन मेट्रो जानेवारी अखेरीस धावणार

Pune Corona | अत्यंत चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1100 पेक्षा जास्त कोरोनाचे नवे रूग्ण आढळले, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona Updates | पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा बंद – अजित पवार

 

Related Posts