IMPIMP

Viral Infection Mumbai | साथीच्या आजाराने डोकेदुखी वाढवली; आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू

by nagesh
Viral Infection Mumbai | be careful viral infection outbreaks during month maharashtra not corona

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Viral Infection Mumbai | कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले असून साथीच्या आजाराने मात्र आरोग्य विभागाची (Maharashtra Health Department) डोकेदुखी वाढवली आहे. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे (dengue) २५४ रुग्ण आढळले असून, गेल्या वर्षी याच महिन्यात डेंग्यूचे फक्त १५ रुग्ण सापडले होते. तर, एकाचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत सात जणांचा म्रुत्यु झाल्याची नोंद पालिकेकडे (BMC) आहे. त्यामध्ये लेप्टोच्या ४ आणि डेंग्यूच्या ३ मृत्यूंचा समावेश आहे. पालिकेतील आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून मलेरियाचे (maleriya) ही रुग्ण वाढल्याचे दिसत आहे. जूनमध्ये मलेरियाचे ३५७ रुग्ण आढळले होते. तर, जुलै अखेरच्या आठवड्यात मलेरियाचे ५५७ रुग्णांची नोंद झाल्याने चिंता वाढली (Viral Infection Mumbai) आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पालिकेच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात मलेरियाचे ५७६, गॅस्ट्रोचे २४७, लेप्टो ३२, डेंग्यू २५४, कावीळ ४१, चिकनगुनियाचे ३३ तर, ८ रुग्ण एचवनएनवनचे आढळले आहेत.
यासंदर्भात बोलताना कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या, साथरोगाबाबत प्रत्येक विभागात जनजागृती वाढवली आहे.
सर्वेक्षण, निदान आणि उपचारांवर भर देण्यात आला आहे.
त्याचबरोबर प्रत्येक रुग्णालयांना रक्त तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये ऑक्टोबरमध्ये वाढ झाली आहे.
पालिका रुग्णालयात बेडची कमतरता जाणवू लागली आहे.
दररोज सरासरी १० डेंग्यूचे रुग्ण आढळूनयेत असून मलेरियाचीही तीच स्थिती आहे.
ऑक्टोबरमध्ये मलेरियाचे दररोज २१ रुग्ण आढळत होते.
या वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयातील खाटा आरक्षित होण्याचे प्रमाण वाढले आहे.
सप्टेंबरमध्ये चिकनगुनियाचे फक्त ७ रुग्ण सापडले होते.
मात्र, ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत तीच संख्या ३३ झाली आहे.
चिकनगुनियाच्या रुग्ण संख्येत चार पटीने वाढ (Viral Infection Mumbai) झाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

राज्यात ९ कोटी ८७ लाख नागरिकांचे कोरोना लसीकरण

 

कोरोना लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जात आह आहे. मंगळवारी २ लाख ६० हजार ४८३ जणांचे लसीकरण झाले
असून राज्यात आतापर्यंत एकूण ९ कोटी ८७ लाख ९३ हजार ८७४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील ३ कोटी ६८ लाख ५४ हजार २०० जणांनी पहिला, तर १ कोटी २१ लाख ५४ हजार ६२७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी ७२ लाख ३८ हजार ३९० जणांनी पहिला, तर १ कोटी ६१ लाख ३९ हजार ९१० जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
१२ लाख ९३ हजार ९०६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ११ लाख १९ हजार २६३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
२१ लाख ४६ हजार ५१९ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून १८ लाख ४७ हजार ०५९ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Viral Infection Mumbai | be careful viral infection outbreaks during month maharashtra not corona

 

हे देखील वाचा :

Bhiwandi Crime | कामाच्या वादातून सहकाऱ्यानेच चिरला 18 वर्षीय तरुणाचा गळा

Live-in Relationship | केवळ ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपमध्ये राहिल्याने मिळत नाहीत वैवाहिक अधिकार, हायकोर्टाने म्हटले…

Pune Crime | ‘जडीबुटी’ औषध निर्मिती करणाऱ्या मुलाकडून जन्मदात्या पित्याचा निर्घृण खून

 

Related Posts