IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 56 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | 12 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

पिंपरी :सरकारसत्ता ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या (Pimpri Corona) नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. शहरामध्ये गेल्या 24 तासात 56 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 62 रुग्णांनी कोरोनावर (Pimpri Corona) मात (Recover) केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. तर गेल्या 24 तासात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्या रुग्णांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे) झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

शहरात गेल्या 24 तासात 3735 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 56 रुग्णांचा अहवाल (Pimpri Corona) पॉझिटिव्ह आला आहे.
आजपर्यंत करण्यात आलेल्या एकूण 21 लाख 83 हजार 344 तपासणीमध्ये 2 लाख 77 हजार 349 जण कोरोना बाधीत (Corona infected) आढळून आले आहेत.
यापैकी 2 लाख 73 हजार 206 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरामध्ये सध्या 366 सक्रिय (active patient) रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये 211 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत तर 155 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात यापूर्वी मृत्यू झालेल्या शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आज शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
आजपर्यंत शहरात 4 हजार 508 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात शहरामध्ये 16 हजार 271 जणांना लस देण्यात आले आहे.
आजपर्यंत शहरामध्ये 25 लाख 25 हजार 283 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : Pimpri Corona | In the last 24 hours, 56 new corona patients have been diagnosed in Pimpri Chinchwad

हे देखील वाचा :

Pune Crime | भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचे खरे कारण आले समोर, जाणून घ्या

Tim Southee | न्यूझीलंडचा फास्ट बॉलर टीम साऊदीने तोडले 42 वर्षाचे जुने रेकॉर्ड; 5 विकेट घेणार ठरला पहिलाच गोलंदाज

Samantha Prabhu | घटस्फोटानंतर समंथा प्रभू झाली ‘बायसेक्सुअल’, नक्की जाणून घ्या काय आहे या मागचं सत्य?

Related Posts