IMPIMP

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे तब्बल 2562 नवीन रुग्ण, ओमायक्रोनचे 29 रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Updates | In the last 24 hours in Pimpri Chinchwad, 2562 new patients of 'Corona', 29 patients of Omycron; Learn other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन –पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना (Pimpri Corona Updates) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असताना ओमायक्रोन व्हेरियंटने (Omycron Covid Variant) चिंता वाढवली आहे. रुग्ण वाढत असल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Updates) 2562 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात महापालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 2562 नवीन रुग्ण (Pimpri Corona Updates) आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 94 हजार 823 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 994 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 78 हजार 511 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरामध्ये सध्या 12515 अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) आहेत. यामध्ये होम क्वारंटाईनमध्ये 12,168 तर संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 347 रुग्ण आहेत. आज दिवसभरात शहरातील एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,528 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 16 हजार 909 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारामध्ये 31 लाख 47 हजार 046 जणांना लस देण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ओमायक्रोनचे 29 नवीन रुग्ण
आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये ओमायक्रोनचे 29 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
यापैकी 19 पुरुष व 10 महिलांचा समावेश आहे. हे रुग्ण रॅण्डम तपासणीमध्ये (Random Check) ओमायक्रोन बाधित आढळून आले आहे.
29 रुग्णांपैकी 26 रुग्णांची 10 दिवशी पुन्हा तपासणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
उर्वरीत 3 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले
असल्याची माहिती सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे (Assistant Health Medical Officer Dr. Laxman Gofane) यांनी दिली.

Web Title :- Pimpri Corona Updates | In the last 24 hours in Pimpri Chinchwad, 2562 new patients of ‘Corona’, 29 patients of Omycron; Learn other statistics

हे देखील वाचा :

Pfizer MRNA Vaccine | फायझरची एमआरएनए लस उपलब्ध करून द्या ! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

Heart Disease in Winter | हिवाळ्यात वाढू शकतो हृदयरोगाचा धोका, बाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या हृदय निरोगी ठेवण्याचे उपाय

Cough Cure | हिवाळ्यात छातीमधील कफ त्रास देतोय का? मग या घरगुती उपायांनी करा परिणामकारक उपाय

Related Posts