IMPIMP

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 3494 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | In Pimpri Chinchwad, the number of corona patients has decreased there is no death today Learn other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटल्याने शहरातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजाराच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या (Pimpri Corona Updates) नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासात 3 हजार 494 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 3 हजार 491 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 9 हजार 431 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 3491 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) रुग्णांची संख्या 3 लाख 37 हजार 561 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 3494 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 05 हजार 164 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

शहरामध्ये सध्या 28,580 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 566 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 28 हजार 014 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर यापूर्वी मृत्यू झालेल्या शहरातील तीन रुग्णांचा मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,548 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title : Pimpri Corona Updates | In the last 24 hours in Pimpri Chinchwad, 3494 patients have been released ‘corona’, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पतीच्या व्यवसायातील 33 वर्षीय भागीदाराकडून 46 वर्षाच्या महिलेवर बलात्कार

Online PPF Account | पीपीएफ अकाऊंट उघडू शकता ऑनलाइन, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया आणि योजनेचे फायदे

Multibagger Stock | रू. 86.80 वरून 384 रुपयांच्या पुढे गेला ‘हा’ शेयर, गुंतवणुकदारांना 4.43 लाखांचा फायदा

Employee Pension Scheme | रू.15000 ची मर्यादा हटवल्यास वाढतील पैसे ! रू. 20000 बेसिक सॅलरीवाल्यांना मिळेल रू. 8571 पेन्शन

Sara Sachin Tendulkar | सचिनची मुलगी सारा तेंडुलकरला मिळाली ‘या’ खास व्यक्तीकडून खास मिठी..

Malaika Arora Bold-Hot | शॉर्ट ड्रेस घालून मलाईका अरोरानं केलं फोटोशूट, तिच्या बोल्ड फोटोमुळं वाढला सोशल मीडियाचा पारा ! पाहा व्हायरल फोटो

 

Related Posts