IMPIMP

Pune Crime | पतीच्या व्यवसायातील 33 वर्षीय भागीदाराकडून 46 वर्षाच्या महिलेवर बलात्कार

by nagesh
Pune Minor Girl Rape Case | Pretending to be pregnant by torturing a minor girl by showing the lure of marriage Pune Minor Girl Rape Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पतीच्या व्यवसायात भागीदार (Business Partner) असलेल्या एकाने महिलेला जीवे मारण्याची धमकी (Threat) देऊन बलात्कार (Rape in Pune) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) धायरी येथे 27 जानेवारी 2021 ते 3 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी धायरी येथील रायकर मळा (Raikar Mala Dhayari) येथे राहणाऱ्या 33 वर्षाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत 46 वर्षाच्या पीडित महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव (PSI Nitin Jadhav) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचा भाजी (Vegetable) खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. पतीच्या व्यवसायात आरोपी भागीदार आहे. यामुळे पीडित महिलेची आणि आरोपीची ओळख झाली. आरोपी पीडित महिलेला भाजी खरेदी करण्याच्या बाहाण्याने घेऊन जात होता. याच दरम्यान त्याने महिलेला आपल्या जाळ्यात ओढून तिचा विश्वास संपादन केला.

 

यानंतर आरोपीने महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन डोणजे (Donje), खडकवासला (Khadakwasla) येथील लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
तसेच याबाबत कोणाला सांगितले तर घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
आरोपीकडून होत असलेल्या अत्याचाराला वैतागून पीडित महिलेने मंगळवारी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फीर्याद दिली.
पीडित महिलेच्या तक्रारीवरुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | 46-year-old woman raped by 33-year-old partner in her husband’s business

 

हे देखील वाचा :

Online PPF Account | पीपीएफ अकाऊंट उघडू शकता ऑनलाइन, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया आणि योजनेचे फायदे

Multibagger Stock | रू. 86.80 वरून 384 रुपयांच्या पुढे गेला ‘हा’ शेयर, गुंतवणुकदारांना 4.43 लाखांचा फायदा

Employee Pension Scheme | रू.15000 ची मर्यादा हटवल्यास वाढतील पैसे ! रू. 20000 बेसिक सॅलरीवाल्यांना मिळेल रू. 8571 पेन्शन

 

Related Posts