IMPIMP

Pimpri Pune Crime | पत्नीचा खून करून पतीची गळफास घेत आत्महत्या, भोसरी परिसरातील घटना

by nagesh
Jalna Crime News | 18 year old boy stabs 8 year old brother to death in jalna

 पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pimpri Pune Crime | घरगुती वादातून (Domestic Dispute) पत्नीचा गळा आवळून डोक्यात पाटा घालून खून (Wife Murder) केला. यानंतर पतीने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (Husband Committed Suicide) घटना भोसरी येथे घडली आहे. ही घटना (Pimpri Pune Crime) बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास भोसरी येथील गंधर्वनगरी (Gandharvanagari) येथे उघडकीस आली. शांताबाई शिवराय ऐवळे Shantabai Shivarai Aiwale (वय-52) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर शिवराय तुकाराम ऐवळे Shivarai Tukaram Aivele (वय-60 रा. गंधर्वनगरी, मोशी) असे आत्महत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत मुलगा सचिन शिवराय ऐवळे Sachin Shivarai Aiwale (वय-36 रा. गंधर्वनगरी, मोशी) याने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. (Pimpri Pune Crime) पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराय हे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. त्यांचे आणि पत्नी शांताबाई यांच्यामध्ये सतत घरगुती कारणावरुन वाद होत होते. बुधवारी सकाळी त्यांचा मुलगा कामानिमित्त बाहेर गेला. त्यावेळी त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातून शिवराय याने पत्नी शांताबाईचा गळा दाबून आणि डोक्यात दगडी पाटा घालून खून (Murder In Pune) केला.

 

पत्नीचा खून केल्यानंतर शिवराय याने गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान त्यांची मुलगी घरी आली. त्यावेळी घराचा दरवाजा बंद असल्याने तिने भावाला फोन केला.
त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास मुलगा घरी आला.
त्यावेळी आतून दरवाजा बंद असल्याने बराचवेळ दरवाजा ठोठावला.
परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने दरवाजा तोडला.
त्यावेळी त्याला आई मृतावस्थेत आढळून आली तर वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे (Police Inspector Rajendra Nikalje) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pimpri Pune Crime | Murder of wife and suicide of husband by hanging, incident in Bhosari area

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde On Shivsena | ‘शिवसेना कुणा कुटुंबाची प्रायव्हेट कंपनी नाही’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Congress | अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा नकार! आता ‘या’ दोन नेत्यांमध्ये रंगणार काँग्रेस अध्यक्षपदाची रस्सीखेच

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे तीन ‘डुप्लिकेट’, दोघेजण सापडले तर तिसऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरु

 

Related Posts