IMPIMP

वडगाव र्खुद येथे पंतप्रधान आवास (PM Awas Yojana) योजनेअंतर्गत उभारण्यात आलेला मेगा गृहप्रकल्पातील 1108 सदनिका मार्च 2023 पर्यंत लाभार्थींच्या स्वाधीन करणार – अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे

by nagesh
PM Awas Yojana | 1108 flats in the mega housing project constructed under PM Awas Yojana at Vadgaon khud  Pune will be handed over to the beneficiaries by March 2023 - Additional Municipal Commissioner Ravindra Binwade

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे महापालिकेच्यावतीने (Pune Municipal Corporation (PMC) वडगाव खुर्द (Vadgaon Khurd) येथे
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PM Awas Yojana) उभारण्यात येणार्‍या गृहप्रकल्पाचे (Home Project) काम गतिने पूर्णत्वाच्या दिशेने सुरू आहे.
येत्या मार्च २०२३ पूर्वी येथील आठही १२ मजली इमारतींचे काम पुर्ण करून तब्बल १ हजार १०८ सदनिका नागरिकांच्या स्वाधीन करण्यात येतील.
याठिकाणी सोलर वॉटर हिटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सांडपाण्याचा पुर्नवापर आदी सुविधांसोबतच अभ्यासिका, रिक्रिएशन सेंटर, बालोद्यान आदी
सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत देशभरात राबविण्यात येणार्‍या गृहप्रकल्पांमध्ये महापालिकेने उभारण्यात आलेला
प्रकल्प हा पथदर्शी ठरेल, असा विश्‍वास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (PMC Additional Commissioner Ravindra Binawade) यांनी व्यक्त केला. (PM Awas Yojana)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महापालिकेच्यावतीने याप्रकल्पाचा आढावा घेताना करण्यात आलेल्या सादरीकरणावेळी बिनवडे यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी शहर अभियंता प्रशांत वाघमारे (Prashant Waghmare), अधीक्षक अभियंता युवराज देशमुख (Yuvraj Deshmukh), विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल (Srinivas Kandul), कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे (Bipin Shinde), भाउसाहेब गवळी, श्रीकांत वायदंडे, राहुल साळुंके, राजश्री शिर्के यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

 

शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले, की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PM Awas Yojana) महापालिकेच्यावतीने हडपसर येथे तीन ठिकाणी १०२४, खराडी येथे ७८६ आणि सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी लगत वडगाव खुर्द येथे १ हजार १०८ सदनिका बांधण्यात येत आहे. कोरोना काळात फेब्रुवारी २०२० मध्ये या प्रकल्पांची कामे सुरू करण्यात आली आहेत. या सदनिकांसाठी अर्ज मागवून लॉटरी पद्धतीने त्याचे वाटपही करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी अगदी जागा मिळविण्यापासून, निविदा प्रक्रिया राबविणे, नागरिकांकडून अर्ज मागवून लॉटरी पद्धतीने त्याचे वाटप, सर्व विभागांच्या परवानग्या आदी कामे करण्यात आली आहेत.

 

वडगाव खुर्द येथे १२ मजली ८ इमारती उभारण्यात आल्या आहेत. याठिकाणी ३३० चौ.फूटाच्या वनबीएचके सदनिका बांधण्यात आल्या आहेत. प्रत्येक इमारतींना दोन लिफ्ट, दुचाकी पार्कींगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच आंघोळीचे गरम पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सोलर सिस्टिम, या इमारतींमध्ये निर्माण होणार्‍या मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एस.टी.पी. प्लांटचे काम हाती घेण्यात आले आहे. अगदी बांधकाम व्यावसायीक ज्या सुविधा देतात त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केल्याने महापालिकेने उभारलेली ही सोसायटी नक्कीच देशभरात आदर्श ठरेल असा आमचा विश्‍वास आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले, की येथील सदनिकांची किंमत बारा लाख रुपयांच्या आसपास आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाकडून अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे. तर लाभार्थ्यांना साधारण ९ लाख ५० हजार रुपये भरायचे आहेत. टप्प्याटप्प्याने नागरिकांनी ते भरायला देखिल सुरूवात केली आहे. वडगाव खुर्द आणि खराडी येथील सर्व सदनिकांचे वाटप झाले आहे. केवळ हडपसर येथील २९९ सदनिका शिल्लक आहेत. सर्व प्रकल्पांच्या ठिकाणी सारख्याच सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. अगदी सर्वसामान्य सामान्य कुटुंबातील नागरिक येथे लाभार्थी असल्याने त्यांना बँकांतून कर्ज काढण्यात अडचणी होत्या. महापालिकेने आपल्या परिने बँकेतून कर्ज मिळविण्यास मदत केल्याने नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्णत्वाच्या दिशेने निघाले आहे, याचा आनंद आहे.

 

 

लॉटरीनंतर लाभार्थ्यांना कागदपत्र व बँक प्रकरणापर्यंत मदत करताना सुमारे सगळ्या कुटुंबांसोबत माझा सातत्याने संपर्क आला. प्रत्येकजण आजही सातत्याने माझ्या संपर्कात आहे. कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये सगळे ठप्प असताना अवघ्या दोन ते अडीच वर्षामध्ये प्रकल्प पूर्ण होत असल्याचे समाधान आहे. महापालिकेच्या सेवेत अगदी उमेदीच्या काळामध्ये हजार कुटुंबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यात मी खारीचा वाटा देउ शकलो, यामुळे आणखी उमेद वाढली.

उदय पाटील ( कनिष्ठ अभियंता, पुणे महापालिका) Uday Patil, Junior Engineer, PMC

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मी कोल्हापूरहून पुण्यात येउन नोकरी आणि पार्टटाईम रिक्षा चालविण्याचे काम करतो.
सध्या मी वारजे येथे चाळीमध्ये भाड्याने राहातो.
पुण्यात घर घेणे हे माझ्या स्वप्नाच्याही पलिकडे होते.
स्वत:चे घर नसल्याने ३२ वर्षाचा असूनही माझे लग्न ठरत नव्हते.
परंतू पंतप्रधान आवास योजनेमध्ये माझा नंबर लागला आणि घराचे व लग्नाचे स्वप्नही पूर्ण झाले.
प्रकल्पाचे काम सुरू होण्यापुर्वी सॅम्पल प्लॅट पाहीला, तसेच दर्जेदार काम झाले आहे.
माझा आनंद मी शब्दात सांगू शकत नाही.

सूरज महालुप्डे (सदनिका धारक) Suraj Mahalupde

 

 

Web Title :- PM Awas Yojana | 1108 flats in the mega housing project constructed under PM Awas Yojana at Vadgaon khud  Pune will be handed over to the beneficiaries by March 2023 – Additional Municipal Commissioner Ravindra Binwade

 

हे देखील वाचा :

Shashikant Ghorpade | राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता, नीरा नदीत आत्महत्या केल्याचा संशय

MLA Vaibhav Naik | आमदार वैभव नाईकांवर लाचलुचपक विभागाची कारवाई, आमदार वैभव नाईक म्हणाले…

Mission Baramati | भाजपच्या मिशन बारामतीचे हात बळकट झाले, सुळे विरुद्ध जानकर लढत होणार?

 

 

Related Posts