IMPIMP

MLA Vaibhav Naik | आमदार वैभव नाईकांवर लाचलुचपक विभागाची कारवाई, आमदार वैभव नाईक म्हणाले…

by nagesh
MLA Vaibhav Naik | maharashtra politics shivsena thackeray faction mla vaibhav naik challenge bjp leader nilesh rane contest assembly election

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाइन जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांच्यावर सध्या राज्य लाचलुचपत विभागाची (ACB) कारवाई सुरु आहे. लाचलुचपत विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाकडून बुधवारी वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, यावेळी नाईक गैरहजर राहिले. त्यावर त्यांनी आज गुरुवारी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी हजर राहण्यासाठी आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आणखी वेळ मागून घेतली असल्याचे सांगितले.

 

मी विभागाच्या कार्यवाहीला संपूर्ण सहाय्य करतो आहे. त्यांनी मला काही कागदपत्रे सादर करण्यासाठी सांगितले आहे. पण ती सर्व कागदपत्रे वीस वर्षापासूनची असल्याने त्यांची जमवाजमव करण्यास वेळ लागतो आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडून काही मुदत मागून घेतली आहे. कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर मी तपासाला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. तसेच राज्याच्या गृहखात्यातून याप्रकरणी दबाव असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माझ्यावर होणाऱ्या कारवाईला मी सामोरा जाणार आहे. भाजप (BJP) या प्रकरणात दबाव टाकत आहे.
तेव्हा काहीही झाले, तरी मी भाजपमध्ये जाणार नाही, असे वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे कितीही दबाव आला, तरी आम्ही भाजपात जाणार नाही.
या प्रकरणात दोषी आढळल्यास कारवाईला सामोरे जाण्याची देखील माझी तयारी असल्याचे आमदार वैभव नाईक म्हणाले.

 

Web Title :- Bribery department action against MLA Vaibhav Naik, MLA Vaibhav Naik said…

 

हे देखील वाचा :

Mission Baramati | भाजपच्या मिशन बारामतीचे हात बळकट झाले, सुळे विरुद्ध जानकर लढत होणार?

Thackeray Group | ‘100 खोके, भाडोत्री संजय मंडलिक ओके’, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा खासदार संजय मंडलिकांना इशारा

Gopichand Padalkar | ‘उद्धव ठाकरे-राष्ट्रवादीचे विलिनिकरण करा अन्..’ पडळकरांनी सांगितले चिन्ह

Shivsena Chief Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंकडून भुजबळांचे कौतुक, भुजबळ शिवसेनेत असते तर आधीच मुख्यमंत्री झाले असते

 

Related Posts