IMPIMP

PM Kisan Samman Nidhi Scheme | मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! PM किसान योजनेच्या e-KYC अपडेटसाठी पुन्हा मुदतवाढ

by nagesh
PM Kisan eKYC | pm kisan latest update 11th installment will be available without ekyc or not know here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan Samman Nidhi Scheme | मोदी सरकारने (Modi Government) देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना’ (PM Kisan Samman Nidhi Scheme) सुरु केली. या योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळत आहे. सरकार या योजनेबाबत वेळोवेळी बदल अथवा अपडेट देत असते. अशातच आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेची ई – केवायसी (e-KYC) अपडेट करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई – केवायसी बंधनकारक आहे. ई – केवायसी आता 22 मे 2022 पर्यंत पूर्ण करता येणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पीएम किसान योजने अंतर्गत ई – केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 मार्च होती. या योजनेचा आगामी हप्ता (11 वा ) 1 एप्रिल 2022 नंतर कधीही तुमच्या खात्यात येऊ शकतो, पण, जर तुम्ही ई – केवायसी पूर्ण केली नसेल तर येणारा 2 हजार रुपयांचा हप्ता मिळणार नाही.

 

पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई – केवायसी अनिवार्य आहे. यासाठी आधारच्या OTP प्रमाणीकरणाकरिता किसान कॉर्नर मधील ई – केवायसी पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधावा लागतो. अशी माहिती पीएम किसान या पोर्टलवर (PM Kisan Portal) दिली आहे.

 

दरम्यान, UIDAI च्या OTP सेवा जारी केल्यामुळे, OTP सत्यापित करत असताना पुढील प्रतिसाद मिळण्याकरिता विलंब होत आहे. यामुळे ई – केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2022 ही अंतिम तारीख बदलण्यात आली आहे. पोर्टलवरील नवा अंतिम मुदत वाढवून आता 22 मे 2022 अशी करण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अशी पूर्ण करा ई – केवायसी (e KYC) –

प्रथम https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.

तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्‍यात e-KYC चा पर्याय दिसेल.

तुम्हाला या e-KYC वर क्लिक करावं लागेल.

आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.

यानंतर तुम्हाला ईमेज कोड टाकावा लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावं लागेल.

आता तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल आणि OTP भरावा लागेल.

यानंतर, तुमची सर्व माहिती पूर्णपणे बरोबर असल्यास ही eKYC प्रक्रिया पूर्ण होईल.

तुमची प्रक्रिया चुकली असेल, तर invalid असं स्क्रीनवर येईल.

चुकलेली माहिती तुम्ही आधार सेवा केंद्राला भेट देऊन दुरुस्त करून घेऊ शकता.

 

Web Title :- PM Kisan Samman Nidhi Scheme | PM Kisan Samman Nidhi Scheme pm kisan extends ekyc deadline

 

हे देखील वाचा :

Mouni Roy Sizzling Photoshoot | मौनी रॉयनं केलं सिझलिंग फोटोशूट, खूर्चीवर बसून दिल्या अशा पोज

Sun Poisoning | उन्हाळ्यात उन्हामुळे होऊ शकते ‘सन पॉयझनिंग’, जाणून घ्या याची लक्षणे आणि बचाव

IAS Tina Dabi यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर करत दिली लग्नाची बातमी, फोटोतूनच दिसत आहे जोडीदारासोबतची केमिस्ट्री

 

Related Posts