IMPIMP

PM Kisan Samman Yojana | PM किसान योजनेत महत्त्वाचे 2 बदल, जाणून घ्या

by nagesh
PM Kisan Samman Nidhi Yojana | pm kisan samman nidhi social audit to start from may pm kisan nidhi 11th instalment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारकडून (Central Government) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Samman Yojana) शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही रक्कम चार महिन्यात तीन टप्प्यात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत (PM Kisan Samman Yojana) दोन महत्त्वाचे बदल (Major Changes) करण्यात आले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Yojana) लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान पोर्टलला (PM Kisan Portal) भेट देऊन त्यांच्या हप्त्याबद्दल माहिती मिळू शकत नाही. परंतु, आता पीएम किसान पोर्टलवरील ही माहिती पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे. त्यानंतरच तुमच्या हप्त्यासंबंधी सर्व माहिती (Installment Information) बघता येणार आहे.

 

दुसरा महत्वाचा बदल म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी (E-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुम्ही या योजनेसाठी नोंदणी केली असेल आणि ई-केवायसी अजूनही केले नसेल तर तुम्हाला 11 व्या हप्त्यापासून वंचित रहावे लागेल. ज्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत.

11 वा हप्ता एप्रिलमध्ये?
आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 10 व्या हप्त्यापर्यंतचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना 10 वा हप्ता 1 जानेवारी 2022 रोजी त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.
आता 11 वा हप्ता एप्रिल महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या लोकांना पैसे परत करावे लाणार
पंतप्रधान किसान योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांनी चुकीची माहिती (Wrong Information) भरली असले
तर त्यांना मिळालेले पैसे परत करावे लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही पात्र नसतानाही चुकीची माहिती देऊन नोंदणी करु नका.

 

Web Title :- PM Kisan Samman Yojana | two major changes in pm kisan yojana 11 installment

 

हे देखील वाचा :

Lalu Prasad Yadav Fodder Scam | चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना शिक्षा आणि दंड

Corporator Chanda Lokhande | पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दुसरा धक्का! शहर नेतृत्वावर नाराज होत नगरसेविका चंदा लोखंडे यांचा राजीनामा

PMC JICA Project | मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पाची कंत्राटाची प्रक्रिया पूर्ण, खासदार गिरीश बापट यांच्या पाठपुराव्यास मोठे यश

 

Related Posts