IMPIMP

PM Narendra Modi Visit To Pune | पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा ! ‘पालिका निवडणुकीतील पराभवाची भाजपची कबुली’ – माजी आमदार मोहन जोशी

by nagesh
Mohan Joshi Pune | 'BJP postpones Cantonment Board elections due to fear of defeat' - Mohan Joshi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPM Narendra Modi Visit To Pune | पाच वर्ष निष्क्रीय राहिल्याने महापालिका निवडणुकीत पराभव होण्याची भिती वाटू लागल्याने पुण्यातील भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा (PM Narendra Modi Visit To Pune) ठरविला आहे. पण हा भाजपचा (BJP) प्रयत्न केविलवाणा आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मेट्रो रेल प्रकल्प (Pune Metro) २० टक्केही पूर्ण झालेला नाही तरीही मेट्रोच्या उदघाटन पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात येत आहे.
मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पाचा (Pune River Rejuvenation Project) प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल.
भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या उदासीनतेमुळे मुळा मुठा नदी सुधार प्रकल्प (Mula Mutha River Development Project) लांबला आणि आता महापालिका निवडणूक (PMC Elections) जवळ आल्याने पंतप्रधानांना बोलावून कामाचा देखावा उभा केला जात आहे.
पुणेकरांना वास्तव लक्षात आल्याने भाजपची केविलवाणी धडपड पुणेकर पहात आहेत,
असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे. (PM Narendra Modi Visit To Pune)

 

महापालिकेच्या २०१७ रोजी झालेल्या निवडणुकीत पुणेकरांनी भाजपचे १०० नगरसेवक निवडून दिले.
त्यापूर्वी भाजपचे खासदार आणि सहा आमदारही निवडून दिले.
एवढे यश पदरात टाकले असतानाही भाजपने निष्क्रीयता दाखवून पुणेकरांचा भ्रमनिरास केला.
आपल्या या कारभारामुळे जनमत विरोधात जात आहे याची जाणीव भाजपला झाली असून पराभव दिसू लागल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) यांना बोलाविण्याचा खटाटोप चालला आहे,
असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- PM Narendra Modi Visit To Pune | PM Modi s visit to Pune BJP admits defeat in municipal
elections Former MLA Mohan Joshi

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | ‘मेट्रोचं काम झालं नसतानाही उद्घाटन’; शरद पवारांचा PM मोदींना टोला

Sharad Pawar | ‘..तेव्हा नारायण राणेंचा राजीनामा घेतला का ?’; शरद पवारांचा भाजपला सवाल

Diabetes Management | डायबिटीज मॅनेज करण्यात टेलिकन्सल्टेशन ठरतंय खुपच उपयोगी; जाणून घ्या

Shane Warne Net Worth | Ferrari, Lamborghini सारख्या महागड्या कारने भरलेले आहे Shane Warne यांचे गॅरेज, एकुण संपत्ती ऐकून वाटेल आश्चर्य

 

Related Posts