IMPIMP

PMC Cut Illegal Water Connections | अतिक्रमण कारवाईनंतर पाणी पुरवठा विभागाचा झटका ! डी.पी. रस्त्यावरील हॉटेल्स, मंगल कार्यालयातील 15 बेकायदा नळ कनेक्शन महापालिकेने तोडली

by nagesh
Pune PMC News | Pune Municipality will impose a fine of Rs 1,000 on illegal flex, banner and hoardings, if the fine is not paid, the revenue will be taxed.

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन PMC Cut Illegal Water Connections | महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) कर्वे नगर (Karve Nagar) येथील डी.पी. रस्त्यावरील (DP Road) बेकायदा हॉटेल्स (Hotels On DP Road), मंगल कार्यालये (Marriage Hall) आणि दुकानांवर कारवाई केल्यानंतर पाणी पुरवठा विभागाने (PMC Water Supply Department) येथील पाणी पुरवठा व्यवस्थेचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षण केलेल्या २६ मिळकतींमध्ये आढळून आलेली बेकायदा १५ नळ कनेक्शन (Tap Connection) तोडली असून एक मोटार व पाईपही जप्त केला. तर उर्वरीत मिळकती व हॉटेल्समध्ये ‘बोअर’ च्या पाण्याचाच वापर होत असल्याचे समोर आले आहे. (PMC Cut Illegal Water Connections)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

महापालिकेने मागील आठवड्यात डी. पी. रस्त्यावरील ग्रीन बेल्टमधील बेकायदा मंगल कार्यालये व हॉटेल्सवर कारवाई केली. काही व्यावसायीकांनी न्यायालयातून स्थगिती घेतली असल्याने कारवाई होउ शकली नाही. परंतू या कारवाईनंतर येथील मंगल कार्यालये व हॉटेल्सला पाणी पुरवठा कसा होतो. महापालिकेने अधिकृत नळ कनेक्शन्स दिली आहेत? याचेही सर्वेक्षण करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने म्हात्रे पुल ते राजाराम पुल (Mhatre Bridge to Rajaram Bridge) दरम्यानची २६ हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि अन्य व्यावसायीकांच्या मिळकतींचे सर्वेक्षण करून तातडीने कारवाई केली. (PMC Cut Illegal Water Connections)

 

यासंदर्भात माहिती देताना पाणी पुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर (PMC Water Supply Superintendent Aniruddha Pawaskar)
यांनी सांगितले, की काल सर्वेक्षण व कारवाईमध्ये अर्धा इंची ७ नळ कनेक्शन,
एक इंची तीन कनेक्शन आणि पाउण इंचाची ५ बेकायदा कनेक्शन बंद करण्यात आली.
तसेच या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये पाण्याची मोटार आणि पाईपही जप्त करण्यात आला.
येथील मंगल कार्यालये आणि हॉटेल्सची संख्या अधिक असल्याने अनेकांनी एक पेक्षा अधिक नळजोड घेतले आहेत.
यामध्ये २५ नळ जोड हे अधिकृत असून मीटरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी केवळ बोअरच्या पाण्याचा वापर होत असल्याचेही समोर आले आहे.
एका मंगल कार्यालय चालकाकडून पाणी बिलाची २ लाख ६१ हजार रुपयांची थकबाकीही तातडीने वसुल करण्यात आली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- PMC Cut Illegal Water Connections | Water supply department shock after encroachment action! D.P. Municipalities cut off 15 illegal tap connections in hotels, mangal office on the road

 

हे देखील वाचा :

Pune MHADA | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडा तब्बल 1200 सदनिकांची सोडत काढणार

Pune Crime | दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड ! एअरगन पिस्टल, कोयता जप्त

Girish Mahajan on Sanjay Raut | “सोंगाड्या चित्रपट निघाला असता तर, ती भूमिका संजय राऊतांना मिळाली असती”

 

Related Posts