IMPIMP

PMC STP Water Tanker | बांधकामांना ‘एसटीपी’ पाण्याची सक्ती, पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर मालकांनी APP वर नोंदणी करण्याचे आवाहन

by nagesh
PMC STP Water Tanker | Mandatory of ‘STP’ water to constructions, tanker owners urged to register on APP for water supply

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  PMC STP Water Tanker | पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा व पाण्याची वाढती मागणी यावर पुणे महानगरपालिकेने नवीन उपाययोजना हाती केली आहे. पुणे शहर आणि परिसरात सुरु असलेल्या बांधकामांना पिण्याचे पाणी वापरले जात होते. (Pune PMC News) याची दखल घेऊन पालिकेने बांधकामासाठी सांडपाण्यावर (Sewage Water) प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याचे आवाहन बांधकाम व्यावसायिकांना (Builders) केले आहे. बांधकाम व्यावसायिकांना प्रक्रिया केलेले पाणी मिळावे यासाठी पालिकेने ‘PMC STP Water Tanker’ नावाचे मोबाईल अ‍ॅप सुरु केले आहे.

पुणे महापालिकेने शहरात सुरु असलेल्या सर्व बांधकामांना सिवेज ट्रीटमेंट प्लॅण्ट मधील प्रक्रिया केलेले पाणी
वापरणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी पालिकेने ‘PMC STP Water Tanker’ अ‍ॅप सुरु केले आहे. बांधकाम व्यावसायिकांना प्रक्रिया केलेले पाणी पाहिजे असल्यास त्यांना या अॅपवर बांधकामाच्या साईटच्या तपशीलासह नोंदणी करावी लागणार आहे. तसेच जे टँकर मालक STP मध्ये प्रक्रिया केलेल्या पाण्याची त्यांच्या टँकरमधून बांधकाम साईटवर वाहतूक करण्यास इच्छूक आहेत, त्यांना देखील नोंदणी करता येणार आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम साईट सुरु आहेत. मात्र, अॅपमध्ये नोंदणी केलेले टँकर कमी पडत आहेत.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पुणे महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या STP मधून प्रक्रिया केलेले पाणी बांधकाम साईटवर टँकरद्वारे
वाहतूक करण्यास जे खाजगी टँकर मालक इच्छुक असतील त्यांनी विनाशुल्क त्यांच्या टँकरची नोंदणी अ‍ॅपवर करावी.
पिण्याचे पाणी बांधकामांना न वापरता फक्त STP मधून प्रक्रिया केलेले पाणी वापरावे यासाठी पालिकेने घेतलेल्या
निर्णयाला टँकर मालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे

Web Title : PMC STP Water Tanker | Mandatory of ‘STP’ water to constructions, tanker owners urged to
register on APP for water supply

Related Posts