IMPIMP

PMRDA Drive-Illegal Structures | पुण्यात अतिक्रमणविरोधी कारवाईला महिलांचा विरोध, महिलांचा इमारतीवर ठिय्या; पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी

by nagesh
PMRDA | Decentralization of building permission authority within PMRDA limits! Commissioner Rahul Mahiwal's decision for dynamic administration

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यातील अनधिकृत बांधकामावर (Pune Illegal Construction) पीएमआरडीएकडून (PMRDA) कारवाई करण्यात येत आहे (PMRDA Drive-Illegal Structures). पुण्यातील मांजरी बुद्रुक (Manjari Budruk) येथील अनिधकृत बांधकामावर पीएमआरडीएकडून सुरु केलेल्या कारवाईला स्थानिक महिलांनी विरोध केला आहे. आक्रमक झालेल्या महिलांनी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरच ठाण मांडले आहे. यामुळे मांजरी बुद्रुक येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुणे पोलिसांचा (Pune Police) मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. महिलांकडून विरोध होत असतानाही पीएमआरडीएच्या अधिकारी अनधिकृत बांधकाम पाडण्यावर ठाम असल्याने पेच निर्माण झाला आहे. (PMRDA Drive-Illegal Structures)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये बांधकाम सुरु असताना एका इमारतीचा स्लॅब कोसळून (Slab Collapsed) सात कामगारांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुण्यातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं Pune Municipal Corporation (PMC) मोहीम राबवत अनधिकृत आणि अतिक्रमण बांधकामावर हातोडा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज पुण्यातील मांजरी (Manjari Illegal Construction) येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरु करण्यात आली. (PMRDA Drive-Illegal Structures)

 

कारवाई सुरु असताना स्थानिक रहिवाशांनी या कारवाईला जोरदार विरोध केला. काही नागरिक व महिला इमारतीवर चढल्या आणि त्याच ठिकाणी ठिय्या दिला. पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी देखील दबावाखाली न येता बांधकाम पाडण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे याठिकाणी स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी 150 हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

 

Web Title :- PMRDA Drive-Illegal Structures | pune manjari residents strongly opposed pmrda drive against illegal structures

 

हे देखील वाचा :

Dombivli Crime | धक्कादायक ! घरातील सोफासेटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, परिसरात प्रचंड खळबळ

PCMC BJP | पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला झटका ! पक्षांतर्गत राजकारणाला वैतागून नगरसेवकाचा राजीनामा

Narayan Rane On Sanjay Raut | ‘संजय राऊतांचा मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर डोळा, राष्ट्रवादीकडून सुपारी’ – नारायण राणे (व्हिडीओ)

 

Related Posts