IMPIMP

POCSO Court | तो 16 वर्षीय मुलीला म्हणाला ‘आयटम’, लैंगिक छळाचे निरीक्षण नोंदवत कोर्टाने सुनावली दीड वर्षांची शिक्षा

by nagesh
 Gondia Minor Girl Rape Case | A music teacher who raped a minor girl was jailed for 11 years and fined 17 thousand

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  एका सोळा वर्षीय मुलीची छेडछाड करताना आयटम (Item) म्हणणे आरोपी तरूणाला महागात पडले आहे. आयटम हा शब्द लैंगिक छळ (Sexual Hharassment) करण्यासाठीच वापरला असल्याचे निरीक्षण नोंदवून पोक्सो न्यायालयाने (POCSO Court) 25 वर्षीय व्यावसायिकाला दीड वर्ष कारावासाची शिक्षा (Imprisonment Sentence) सुनावली. आरोपीने पीडितेचे केस ओढून तिला क्या आयटम किधर जा रही हो? असे विचारले होते. यावेळी विशेष न्यायाधीश एस. जे. अन्सारी (Special Judge S. J. Ansari) म्हणाले, अशा गुन्ह्यांत कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. महिलांचे संरक्षण (Protection of women) करण्यासाठी आणि रोड रोमियोंना (Road Romeo) धडा शिकवण्यासाठी अशा शिक्षेची (POCSO Court) गरज आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली. 25 वर्षीय आरोपी पीडितेशी लैंगिक संबंध (Sexual Relations) ठेवण्याच्या हेतूनेच तिचा पाठलाग करत होता, असेही न्यायालयाने निदर्शनास आणले. भविष्यात चांगले वर्तन करण्याच्या आश्वासनावर आरोपीची सुटका करण्यास न्यायालयाने नकार दिला.

 

आरोपीने पोक्सो न्यायालयात (POCSO Court) दावा केला की, पीडितेचे पालक पीडितेशी असलेल्या मैत्रीच्या विरोधात होते. त्यामुळे त्यांनी मला खोट्या प्रकरणात गोवले. या दाव्यानंतर जुलै महिन्यात पीडितेला न्यायालयात हजर केले असता, तिने आरोपीचा दावा फेटाळून लावला. आरोपीचा दावा सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे कोणतेही सबळ पुरावे नव्हते. ही बाब लक्षात घेऊन न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

 

पीडितेच्या जबाबानुसार, 14 जुलै 2015 रोजी दुपारी दीड वाजता पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत जात होती.
यावेळी आरोपी वाटेत त्याच्या काही मित्रांसोबत बसला होता.
त्याचदिवशी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पीडित मुलगी शाळेतून घरी परतत होती.
तेव्हाही आरोपी त्याच ठिकाणी आपल्या बाईकवर बसला होता.
पीडितेला परत येताना पाहून आरोपीने तिचा पाठलाग सुरू केला.

 

तिच्यामागे येत आरोपीने तिचे केस ओढले आणि क्या आयटम किधर जा रही हो? असे विचारले.
यावेळी पीडितेने असे करू नका, अशी विनंती करूनही आरोपीने तिची छेड काढत शिवीगाळ केली.
यानंतर पीडितेने ‘100’ क्रमांकावर फोन केला.
परंतु, पोलीस घटनास्थळी येईपर्यंत आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- POCSO Court | man called minor girl item pocso court sentence one and half years of imprisonment mumbai crime news

 

हे देखील वाचा :

Ashish Shelar | ज्यांनी अडीच वर्षात शेतकऱ्यांचे अश्रू पुसले नाहीत, ते आता दौरे करत आहेत, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला

Omprakash Rajenimbalkar | शेतकऱ्याचं हिताचे बोलता येत नसेल, तर…, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरांचा विरोधकांना इशारा

Rishi Sunak | UK मध्ये रचला इतिहास, भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनले नवे पंतप्रधान

 

Related Posts