IMPIMP

Rishi Sunak | UK मध्ये रचला इतिहास, भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनले नवे पंतप्रधान

by nagesh
Rishi Sunak | indian origin rishi sunak new britain pm won tory leadership election conservative party uk tlifws

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान (Prime Minister) बनले असून त्यांनी इतिहास रचला आहे. ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी पेनी मॉर्डोंटचा (Penny Mordont) पराभव करून विजय मिळवला आहे. ऋषी सुनक यांना 180 हून अधिक खासदारांचा पाठिंबा मिळाला. सूत्रांच्या माहितीनुसार ऋषी सुनक 28 ऑक्टोबरला शपथ घेण्याची शकतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

45 दिवस ब्रिटनच्या पंतप्रधानपदी असलेल्या लिझ ट्रस (Liz Truss) यांनी राजीनामा (Resignation) दिल्यानंतर पुन्हा एकदा निवडणुका झाल्या. ज्यामध्ये ऋषी सुनक (Rishi Sunak) हे सुरुवातीपासून पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते.

 

सोमवारी स्वत: माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Former PM Boris Johnson) यांनीही पंतप्रधान होण्याच्या शर्यतीतून माघार घेतली, त्यानंतर ऋषी सुनक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. ब्रिटनच्या राजकारणासाठीही हा मोठा दिवस आहे, कारण गेल्या तीन महिन्यांत ऋषी सुनक हे तिसरे व्यक्ती आहेत जे देशाचे पंतप्रधान बनणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सर्वप्रथम बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला, त्यानंतर निवडणुकीत ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस खुर्चीवर बसल्या.
मात्र, त्यांनाही फार काळ सत्ता मिळाली नाही आणि 45 दिवसांत राजीनामा द्यावा लागला.
त्यानंतर पुन्हा एकदा ऋषी सुनक या शर्यतीत सामील झाले आणि यावेळी त्यांनाही विजय मिळाला.

 

Web Title :- Rishi Sunak | indian origin rishi sunak new britain pm won tory leadership election conservative party uk tlifws

 

हे देखील वाचा :

Ramdas Kadam | अजित पवरांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, आणि…, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरुन रामदास कदमांचे टीकास्त्र

MLA Gulabrao Patil | शिंदे गटातील नाराज 22 आमदार भाजपमध्ये जाणार? गुलाबराव पाटील म्हणाले -‘राहिलेले आमदार…’

MLA Sanjay Shirsat | ‘उद्धव ठाकरेंनी आम्हाला दिलासा दिला नाही, त्यामुळे हे रामायण घडले’- आमदार संजय शिरसाट

 

Related Posts