IMPIMP

Omprakash Rajenimbalkar | शेतकऱ्याचं हिताचे बोलता येत नसेल, तर…, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरांचा विरोधकांना इशारा

by nagesh
Omprakash Rajenimbalkar | If you cannot speak for the interests of farmers, MP Omprakash Rajenimbalkar warns the opposition

उस्मानाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन शेतकऱ्यांसाठी विविध मागण्या घेऊन शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार आणि जिल्हाप्रमुख कैलास घाडगे पाटील (Kailas Ghadge Patil) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) टीका केली. शेतकरी हिताच्या आंदोलनाला पाठींबा देता येत नसेल, तर किमान थोबाड तरी बंद करा, असे ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) विरोधकांना सुनावलं.

 

आम्ही शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण सुरु केले आहे. विमा कंपन्यांनी (Insurance Companies) शेतकऱ्यांचे पैसै देण्यासाठी आम्ही मागणी करत आहोत, तर आता भाजपच्या पोटात का दुखत आहे? तुमची दलाली बुडते म्हणून तुमच्या पोटात दुखत आहे का? विमा कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आदेश दिले असून देखील विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाहीत. त्यामुळे भाजपने आमच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. पण ते तसे करीत नाहीत. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आम्ही देत असलेल्या लढ्याला जर राजकीय अडचणीमुळे पाठिंबा देता येत नसेल, तर किमान आपली थोबाडे बंद तरी ठेवा, असे राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भाजप नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात आणि विमा कंपन्यांना धार्जिनी भूमिका घेत आहे.
शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. जगाचा पोशिंदा आर्थिक विवंचनेत आहे.
आतापर्यंत 39 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पण अद्याप त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हेक्टरी 18000 रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळाली पाहिजे.
त्यामुळे आमच्या मागण्यांचा विचार सरकारने करावा,
आणि शेतकऱ्याला दिवाळी साजरी करु द्यावी. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येत नाहीत,
तोपर्यंत आम्ही देखील दिवाळी साजरी करणार नाही, असे राजेनिंबाळकर म्हणाले.

 

Web Title :- Omprakash Rajenimbalkar | If you cannot speak for the interests of farmers, MP Omprakash Rajenimbalkar warns the opposition

 

हे देखील वाचा :

Rishi Sunak | UK मध्ये रचला इतिहास, भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनले नवे पंतप्रधान

Ramdas Kadam | अजित पवरांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, आणि…, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरुन रामदास कदमांचे टीकास्त्र

MLA Gulabrao Patil | शिंदे गटातील नाराज 22 आमदार भाजपमध्ये जाणार? गुलाबराव पाटील म्हणाले -‘राहिलेले आमदार…’

 

Related Posts