IMPIMP

Police Committed Suicide | खळबळजनक! नैराश्यातून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

by nagesh
Police Committed Suicide | police constable commits suicide due to depression

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन  – नागपूर शहर पोलीस (Nagpur City Police) दलातील पोलीस शिपायाने राहत्या घरामध्ये आत्महत्या (Police Committed Suicide) केली. पत्नीचे निधन झाल्यामुळे गेल्या वर्षभरापासून नैराश्यात असलेल्या संतोष वानखेडे (Santosh Wankhede) यांनी राघुजीनगर पोलीस क्वॉर्टरमध्ये शनिवारी (दि.17) सकाळी गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Police Committed Suicide) केली. ते बेलतरोडी पोलीस ठाण्यात (Beltarodi Police Station) कार्यरत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष यांची सुरुवातीला लोहमार्ग पोलीस ठाण्यात (Lohmarg Police Station) नियुक्ती झाली होती. त्यानंतर ते शहर पोलिसात आले. सध्या बेलतरोडी पोलीस ठाण्यात नायक पोलीस शिपाई (Nayak Police Constable) म्हणून कार्यरत होते. त्यांचे आई-वडील यवतमाळ येथे राहतात. त्यांची पत्नी मध्य रेल्वेत (Central Railway) कार्यरत होती. मात्र, मागील वर्षी आजारामुळे त्यांचे निधन झाले. पत्नीच्या निधना पासून ते नैराश्यात होते. त्यांना 12 वर्षाचा मुलगा असून तो त्यांच्या आई-वडिलांकडे राहतो.

 

संतोष हे एकटेच राहत होते. सर्वांशी मिळून मिसळून राहत असल्यामुळे त्यांचे सर्वच पोलिसांसोबत चांगले संबंध होते.
शनिवारी अधिवेशनाची ड्यूटी लावण्यात आली होती.
मात्र, ते बेलतरोडी ठाण्यात ड्यूटीवर हजर न झाल्याने पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कर्मचाऱ्याकडे संपर्क साधला. कर्मचाऱ्याने संतोष राहत असलेल्या क्वॉटर्सवर गेला.
त्यावेळी त्यांना संतोष यांनी गळफास (Police Committed Suicide) घेतल्याचे दिसले.
या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात (Hudkeshwar Police Station)अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Police Committed Suicide | police constable commits suicide due to depression

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | शाईफेकीच्या धमकीनंतर चंद्रकांत पाटलांची खबरदारी, ‘फेसशिल्ड’ लावून केलं ‘पवनाथडी जत्रे’चं उद्घाटन

Aadhaar सोबत लिंक नसेल Voter ID तर मतदार यादीतून वगळले जाईल नाव?, जाणून घ्या सविस्तर

BIG Marathi Entertainment Awards | बिग एफ.एम च्या ‘बिग मराठी एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्स’ च्या दुसऱ्या भागात मधुराणी गोखले आणि विवेक सांगळे यांनी ‘बिग बेस्ट कॅरेक्टर’ ची ट्रॉफी जिंकली!

 

Related Posts