IMPIMP

Chandrakant Patil | शाईफेकीच्या धमकीनंतर चंद्रकांत पाटलांची खबरदारी, ‘फेसशिल्ड’ लावून केलं ‘पवनाथडी जत्रे’चं उद्घाटन

by nagesh
Chandrakant Patil | pune chandrakant patilanchi attended the opening wearing a face shield

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन  – भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधाननंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. याच दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्य़क्रमासाठी आले असताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. या घटनेनंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर शाईफेक करण्याची धमकी देण्यात आली आहे.

 

राष्ट्रवादी (NCP) सोशल मीडिया अध्यक्ष विकास लोले (Vikas Lole) याने फेसबुक अकाउंट वरुन पुन्हा शाईफेक करण्याची धमकी दिली आहे. याबाबत पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या धमकीनंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा शाईफेक होऊ नये यासाठी फेसशिल्ड (Faceshield) लावत पवनाथडी जत्रेच्या (Pavanathadi Jatra) उद्घाटनाला हजेरी लावली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मी घाबरत नाही

एखाद्याला शाई फेकून आनंद मिळत असेल तर चांगले आहे.
सर्वांना प्रश्न पडेल की फेसशिल्ड घाबरुन घालून आलेत का? मी घाबरत नाही,
एखाद्याला शाई फेकून आनंद मिळतो पण माझे कार्यकर्ते आणि पोलीस काय झोपलेले नाहीत,
असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
सांगवी येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation)
पवनाथडी जत्रेचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 

Web Title :- Chandrakant Patil | pune chandrakant patilanchi attended the opening wearing a face shield

 

हे देखील वाचा :

Aadhaar सोबत लिंक नसेल Voter ID तर मतदार यादीतून वगळले जाईल नाव?, जाणून घ्या सविस्तर

BIG Marathi Entertainment Awards | बिग एफ.एम च्या ‘बिग मराठी एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्स’ च्या दुसऱ्या भागात मधुराणी गोखले आणि विवेक सांगळे यांनी ‘बिग बेस्ट कॅरेक्टर’ ची ट्रॉफी जिंकली!

Gulabrao Patil | संजय राऊत काय मेंदूचे डॉक्टर आहेत का?, गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र

Maharashtra IPS Transfer | अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची राज्य कारागृह प्रमुख पदी नियुक्ती, तर पिंपरी चिंचवड सह पोलीस आयुक्त पदी लोहीया

 

Related Posts