IMPIMP

Aadhaar सोबत लिंक नसेल Voter ID तर मतदार यादीतून वगळले जाईल नाव?, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Aadhaar | voter id not linked to aadhaar will name be cut from voter list know details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– आधार कार्ड हे भारतातील महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. शाळेत प्रवेशापासून ते बँकेपर्यंत आधार कार्ड (Aadhaar Card)
अनिवार्य आहे. त्याचबरोबर आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक (Aadhaar Link With Pan Card) करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास पॅन कार्ड रद्द
केले जाईल. आता निवडणूक आयोगाने नागरिकांना मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्यास सांगितले आहे (Aadhaar Card Link With Voter
ID Card).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाइटवर Voter ID शी आधार लिंक करण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक न केल्यास मतदार यादीतून नाव वगळले जाईल का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. शुक्रवारी लोकसभेत या प्रश्नाच्या लेखी उत्तरात कायदा मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, जर तुमचे आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी लिंक नसेल, तर तुमचे नाव मतदार यादीतून हटवले जाणार नाही.

 

मंत्र्यांनी माहिती दिली की The Election Laws (Amendment) Act, 2021 मध्ये अशी तरतूद आहे की आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी लिंक केले जाऊ शकते, परंतु ते लिंक करावे की नाही हे नागरिकाच्या इच्छेवर अवलंबून असेल. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक केले नसले तरी कोणतीही अडचण येणार नाही आणि मतदारांची नावेही यादीतून कापली जाणार नाहीत.

 

५४ कोटी मतदार ओळखपत्र आधारशी लिंक

मंत्र्यांनी एका निवेदनात माहिती दिली की सुमारे ९५ कोटी मतदारांपैकी ५४ कोटी मतदारांनी त्यांचे आधार
मतदार ओळखपत्राशी लिंक केले आहे. तुम्हालाही तुमचे आधार मतदार ओळखपत्राशी लिंक करायचे असेल,
तर तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन किंवा निवडणूक अधिकाèयाशी संपर्क साधून हे काम पूर्ण करू शकता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मतदार ओळखपत्र लिंक करण्याची मोहीम

निवडणूक आयोगाने १ ऑगस्टपासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आधार कार्डला मतदार ओळखपत्राशी जोडण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे.
या अंतर्गत लोकांच्या इच्छेनुसार आधारला मतदार ओळखपत्राशी जोडले जात आहे.
निवडणूक अधिकारी घरोघरी जाऊन मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करण्याबाबत विचारणा करत आहेत.

 

Web Title :- Aadhaar | voter id not linked to aadhaar will name be cut from voter list know details

 

हे देखील वाचा :

BIG Marathi Entertainment Awards | बिग एफ.एम च्या ‘बिग मराठी एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्स’ च्या दुसऱ्या भागात मधुराणी गोखले आणि विवेक सांगळे यांनी ‘बिग बेस्ट कॅरेक्टर’ ची ट्रॉफी जिंकली!

Gulabrao Patil | संजय राऊत काय मेंदूचे डॉक्टर आहेत का?, गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र

Maharashtra IPS Transfer | अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची राज्य कारागृह प्रमुख पदी नियुक्ती, तर पिंपरी चिंचवड सह पोलीस आयुक्त पदी लोहीया

 

Related Posts