IMPIMP

Police Inspector Suspended | डॉक्टरला मारहाण करून 25 हजार रूपये घेतले ! पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

by nagesh
 Police Inspector Suspended | 3 Mumbai cops suspended for ‘assaulting, extracting Rs 25,000’ from 2 doctors

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन – Police Inspector Suspended | नो-एन्ट्रीमधून (No-Entry) वाहन चालवल्यामुळे डॉक्टरला मारहाण करून त्यांना चौकशी दरम्यान 3 तास पोलिस ठाण्यात उभं केल्यानंतर कारवाई न करण्यासाठी 25 हजार रूपये (Mumbai Bribe Case) घेतल्याप्रकरणी समता नगर पोलिस स्टेशनमधील (Samta Nagar Police Station) 2 पोलिस अधिकार्‍यासह एका पोलिस नाईकला अप्पर पोलिस आयुक्त (नॉर्थ रिजन) राजीव जैन (IPS Rajiv Jain) यांनी तडकाफडकी निलंबीत केले आहे. (Police Inspector Suspended)

 

पोलिस निरीक्षक प्रकाश वसंत पवार (PI Prakash Vasant Pawar), पोलिस उपनिरीक्षक प्रफुल्ल भाऊसाहेब मिसाळ (Prafulla Bhausaheb Masal) आणि पोलिस नाईक सचिन रामराव पाटील (Police Sachin Ramrao Patil) अशी निलंबीत करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात डॉ. सार्थक राठी यांनी तक्रार दिली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. राठी आणि त्यांचे मित्र डॉ. शिरीष राव हे दि. 25 एप्रिल 2023 रोजी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांच्या जाळयात सापडले होते. पोलिसांनी त्यांना कारवाईसाठी समता नगर पोलिस स्टेशनमध्ये नेले (Mumbai Crime News). तेथे त्यांना दुपारी साडे तीन ते सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत उभं राहण्यास सांगण्यात आलं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही डॉक्टरांना पोलिसांनी मारहाण देखील केली. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडून 25 हजार रूपये देखील घेण्यात आले. (Police Inspector Suspended)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, डॉ. राठी यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे याबाबत तक्रार दिली.
वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनेच्या चौकशी दरम्यान पोलिस स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेरा तपासला.
त्यावेळी त्यांना 3 तास उभं ठेवण्यात आल्याचं स्पष्ट झालं.
चौकशीमध्ये पोलिस निरीक्षक प्रकाश वसंत पवार, पोलिस उपनिरीक्षक प्रफुल्ल भाऊसाहेब मिसाळ आणि
पोलिस नाईक सचिन रामराव पाटील हे दोषी आढळले.
त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांची विभागीय चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Police Inspector Suspended | 3 Mumbai cops suspended for ‘assaulting, extracting Rs 25,000’ from 2 doctors

 

हे देखील वाचा :

NCP Chief Sharad Pawar Withdrew His Resignation | शरद पवारच गॉडफादर! त्यांनी राजीनामा मागे घेतला, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कायम राहणार (Video)

Pune Police Crime Branch News | मोबाईल हिसकाविणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, अल्पवयीन ताब्यात

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा ! क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी, ३० यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांचा सलग दुसरा विजय

 

Related Posts