IMPIMP

Pandharpur News : अवैध सावकारी प्रकरणी भाजप नेत्याच्या घरावर पोलिसांचा छापा

by bali123
vidul pandurang adhatrao

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे निकटवर्तीय आणि भाजपा युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्ष विदूल पांडूरंग अधटराव ( vidul pandurang adhatrao ) यांच्या घरावर अवैध सावकारी प्रकरणी पोलीस व सहाय्यक निबंधकांनी धाड टाकली आहे. शनिवारी (दि. 6) ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कारवाईत अधटराव (vidul adhatrao) यांच्या घराच्या झडतीमध्ये एकूण 48 चेक, 9 हिशोब वहया, कोरा स्टॅम्प, चेकबुके, बँक पासबुके आदीसह रोख रक्कम 29 हजार 340 रूपये पोलिसांनी जप्त केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खाजगी सावकार म्हणून विदूल अधटराव यांनी पैशाचे व्यवहार केले होते. अधटराव यांच्यापाठोपाठ त्यांच्या इतर साथीदारांचाही पोलीसांनी शोध सुरु केला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार, उपनिरीक्षक प्रशांत भागवत,
पोलीस कर्मचारी गोविंद कामतकर, सुनील पवार, निता डोकडे यांनी ही कारवाई केली आहे.

भाजपच्या चित्रा वाघ यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर पोलिसांची ‘धाड’ !

हूँ दृष्टि हीन ,पर दिशा हीन नहीं मैं.. म्हणत, बिग बी कवितेतुन झाले व्यक्त

Mansukh Hiren : सचिन वाझे-शिवसेना कनेक्शन अडचणीचं ठरणार ?

Mansukh Hiren : मनसुख हिरेन यांनी मृत्यूपूर्वी मुख्यमंत्री ठाकरेंना लिहिलेल्या ‘लेटर’मधून धक्कादायक माहिती समोर; कोणी त्रास दिला ?

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : भाजपपाठोपाठ सचिन वाझे मनसेच्या ‘रडार’वर

अंबानी प्रकरण : ‘माझी मानसिक स्थिती ठीक नाही’, कारमालक मनसुखचं मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र

Related Posts