IMPIMP

Post Office Scheme | ‘पोस्ट ऑफिस’च्या स्कीममधून देखील जमा करू शकता 1 कोटी रुपये; दरमहा करावी लागेल इतकी गुंतवणूक, जाणून घ्या

by nagesh
Post Office MIS | post office monthly income scheme husband and wife can open an account together

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Post Office Scheme | पब्लिक प्रोव्हिडंट फंड (Public Provident Fund) म्हणजे PPF सरकारची एक छोट्या बचत योजनांपैकी एक योजना (Post Office Scheme) आहे. जिचा उद्देश मॅच्युरिटीच्या वेळी ठराविक रिटर्न देणे आहे. प्राप्तीकर कायदा कलम 80 सी अंतर्गत पीपीएफ खातेधारक एका आर्थिक वर्षात या योजनेतील गुंतवणीकीवर 1.50 लाख रुपयापर्यंत करसवलतीचा दावा करू शकतो. याशिवाय ही योजना 100 टक्के जोखीम मुक्त आहे. पीपीएफ व्याजदर (PPF Interest) सध्या 7.10 टक्के आहे, तरी सुद्धा 100 टक्के करलाभ आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

15 वर्षानंतर 5-5 वर्षासाठी वाढवू शकता कालावधी

 

या अकाऊंटचा मॅच्युरिटी पिरियड 15 वर्षांचा आहे, परंतु तुम्ही 5-5 वर्षांसाठी दोनवेळा त्यास एक्सटेंड करू शकता.
सोबतच या योजनेत तुम्हाला टॅक्स बेनिफिटसुद्धा मिळते.
सर्वात महत्वाचे म्हणजे या योजनते वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळते आणि जे दरवर्षी कपाऊंडिगचा सुद्धा लाभ देते.
ही योजना (Post Office Scheme) तुम्हाला करोडपती बनवते.

 

पीपीएफ खात्यातून (PPF Account) कसे मिळवाल 1 कोटी रुपये

 

जर तुम्ही मॅच्युरिटी कालावधीच्या पुढे 5-5 वर्ष म्हणजे 10 वर्ष स्कीम एक्सटेंड केली तर तुमची रक्कम 1 कोटीपर्यंत पोहचण्यास मदत होईल.
कशी ते पाहुयात. एका दिवसात 416 रुपये, कमाल मासिक 12500 रुपये आणि वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करावे लागतील.
7.1 टक्केच्या वार्षिक व्याजाने कंपाऊंडिंग लाभ मिळेल. एकुण गुंतवणूक 25 वर्षानंतर 37.50 लाख रुपये होईल.
ज्यावर व्याज 65.58 लाख रुपये होईल. एकुण रक्कम 1.03 कोटी रुपये होईल.

 

अशाप्रकारे जारी ठेवू शकता मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक

 

पीपीएफ अकाऊंटचा मॅच्युरिटी पिरियड 15 वर्षांचा असतो.
यानंतर जर कुणी हे खाते 5 वर्षांसाठी पुढे वाढवत असेल तर त्यांना मॅच्युरिटी पिरियड संपल्यानंतर 1 वर्षाच्या आत फॉर्म 4 जमा करावा लागेल.
यासाठी पूर्वी फॉर्म एच भरावा लागत होता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

हे आहे पूर्ण कॅलक्यूलेशन

 

30 वर्षासाठी सध्या पीपीएफ व्याजदर 7.10 धरला तर, पीपीएफ व्याज कॅलक्युलेटर सांगते की, पीपीएफ खात्यात 1,08,000 रुपये वार्षिक गुंतवणुकीची आवश्यकता आहे.
जसे की पीपीएफ एका गुंतवणुकदाराला एका वर्षात 12 जमांची परवानगी देते.
एक पीपीएफ खातेधारक 1,08,000 रुपये 9,000 रुपयांच्या 12 मासिक हप्त्यांमध्ये सुद्धा गुंतवणूक (Post Office Scheme) करू शकतो.

 

यासाठी, म्युच्युअल फंड एसआयपीप्रमाणे, एक पीपीएफ खातेधारक पीपीएफ खाते उघडण्याच्या 15व्या, 20व्या आणि 25व्या वर्षात विस्तार सुविधेचा वापर करत 30 वर्षांसाठी पीपीएफ खात्यात प्रति महिना केवळ 9,000 रुपयांची गुंतवणूक करून 1 कोटी रुपये जमा करू शकतो.

 

Web Title : Post Office Scheme | post office ppf scheme you can save one crore rupees in 30 years

 

हे देखील वाचा :

Vasai ShivSena | वसईमध्ये शिवसेनेच्या तब्बल 150 पदाधिकार्‍यांचा राजीनामा, जाणून घ्या प्रकरण

Atmanirbhar Bharat Abhiyan | देशाच्या टेक्सटाईल इंडस्ट्रीला मोदी सरकारची मोठी भेट ! 7 मेगा टेक्सटाईल पार्कच्या स्थापनेची अधिसूचना जारी

Mumbai Pune Expressway Accident | ‘तो’ अपघात नव्हे ! 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्री नेमकं काय घडलं? पोलीस तपासातुन ‘पर्दाफाश’

 

Related Posts