IMPIMP

Post Office Schemes | दररोज 150 रुपयांच्या सेव्हिंगने बनवू शकता 15 लाखापर्यंतचा फंड; Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक

by nagesh
Post Office Schemes | by saving rs 150 per day you can create a fund of up to 15 lakhs invest in this scheme of post office

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Post Office Schemes | पब्लिक प्रोव्हिंडंट फंड (PPF) योजना गॅरंटीकृत रिटर्न आणि कर लाभासाठी ओळखली जाते. पीपीएफ खाते उघडणे अतिशय सोपे आहे. यासाठी मोजक्याच कागदपत्रांची आवश्यकता असते. पीपीएफ खात्याचा व्याजदर पोस्ट आणि बँकेत एकसारखाच असतो तो 7.1% आहे. (Post Office Schemes)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पोस्टात पीपीएफ खाते (PPF Account) उघडण्यासाठी पात्रता

– पगारदार, स्वयंरोजगार, पेन्शनधारक इत्यादींसह भारतीय रहिवासी पोस्टात पीपीएफ खाते उघडू शकतात.

– अल्पवयीन मुलांकडून आई-वडील/पालकांद्वारे पोस्ट ऑफिसमध्ये अल्पवयीन पीपीएफ खाते उघडता येते.

– अनिवासी भारतीयांना पीपीएफ खाते उघडण्याची परवानगी नाही. मात्र, जर कुणी भारतीय रहिवाशी पीपीएफ खाते मॅच्युअर होण्यापूर्वी एनआरआय झाला तर तो यासाठी पात्र आहे.

या कागदपत्रांची आहे आवश्यकता
ओळख प्रमाणपत्र म्हणून वोटर आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड आणि पत्त्यासाठी वोटर आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि नामांकन फॉर्म- फॉर्म ई ची आवश्यकता आहे.

पोस्ट जनभविष्य निधी (पीपीएफ) खात्याचे फायदे
हे अकाऊंट केवळ 100 रुपयांनी उघडता येऊ शकते. जॉईंट अकाऊंटसुद्धा उघडू शकता.

अकाऊंट उघडताना यामध्ये नॉमिनेशन फॅसिलिटी असते. 15 वर्षाचा मॅच्युरिटी परियड पूर्ण झाल्यानंतर सुद्धा यास दोन वेळा 5-5 वर्षासाठी वाढवू शकता.

याच्यातून मिळणारे उत्पन्न टॅक्स फ्री असते. अकाऊंटवर तिसर्‍या फायनान्शियल ईयरपासून लोनसुद्धा घेता येऊ शकते.

बँक, पोस्ट ऑफिस तुम्हाला पीपीएफ अकाऊंट उघडण्याची सुविधा देते. हे अकाऊंट 15 वर्षासाठी उघडू शकता, जे पुढे 5 वर्षासाठी वाढवता येऊ शकते.

सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याजदर आहे, जो वार्षिक कंपाऊंडेड आहे. पीपीएफमध्ये मिनिमम 100 रुपयांपासून अकाऊंट उघडू शकता.

पीपीएफ अकाऊंटमध्ये एका फायनान्शियलमध्ये किमान 500 रुपये गुंतवणे आवश्यक आहे. तर तुम्ही एका वर्षात अकाऊंटमध्ये कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

150 रूपयांनी असा बनवू शकता 15 लाखाचा फंड (Post Office Schemes)
जर तुम्ही 150 रुपये रोजच्या बचतीप्रमाणे पीपीएफमध्ये गुंतवणूक केली तर ते 4500 रुपये मासिक होतात. दर महिन्याला 4500 रुपये गुंतवणूक केल्यास वार्षिक गुंतवणूक 54 हजार रुपये होईल. तर, 15 वर्षात एकुण गुंतवणूक 14,64,555 लाख रुपये होईल. 7.1 टक्के वार्षिक कंपाऊंडिंगप्रमाणे यामध्ये तुम्हाला 15 वर्षात सुमारे 20 लाखांपेक्षा जास्त रक्कमेचा तयार फंड मिळेल.

पोस्टात पीपीएफ खाते उघडण्याची प्रक्रिया
अर्ज जवळच्या पोस्टात किंवा ऑनलाइन मिळवावा लागेल आणि तो भरावा लागेल.

पूर्णपणे भरलेला अर्ज आवश्यक केवायसी कागदपत्र, फोटो इत्यादीच्या स्व-सत्यापित प्रतींसह जवळच्या पोस्ट कार्यालयात जमा करा.

खाते उघडण्यासाठी ड्राफ्ट किंवा चेक (किमान 100 रुपये) चा वापर करून सुरूवातीची रक्कम जमा करावी लागेल. या योजनेसाठी किमान वार्षिक योगदान 500 रुपये आहे.

एकदा डाकघर पीपीएफ खाते सुरू झाले की खात्यासाठी एक पासबुक दिले जाते, ज्यामध्ये पूर्ण माहिती असते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title :- Post Office Schemes | by saving rs 150 per day you can create a fund of up to 15 lakhs invest in this scheme of post office

हे देखील वाचा :

LIC Aam Aadmi | ‘एलआयसी’चा सर्वात स्वस्त प्लान ! अवघ्या 200 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर हजारोंचा फायदा; जाणून घ्या

Pune Crime | 11 गंभीर गुन्ह्यातील आरोपी अ‍ॅड. सागर सुर्यवंशीची येरवडा जेलमध्ये रवानगी

Pune RTO | पुणेकरांचा रिक्षा प्रवास महागणार, RTO कडून रिक्षाच्या दरवाढीस मंजुरी; जाणून घ्या किती रुपये वाढणार

Related Posts