IMPIMP

Post Office Transaction Rules | पोस्ट ऑफिसमध्ये 20 हजार रुपयांपेक्षा जास्त ट्रांजक्शनसाठी द्यावी लागतील ‘ही’ कागदपत्रं, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Post Office Investment Scheme | post office scheme post office gram suraksha yojana per day invest 50 rupees and get 35 lakhs

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPost Office Transaction Rules | आजही देशातील मध्यमवर्गीयांची गुंतवणुकीची पहिली पसंती पोस्ट ऑफिस आहे. कारण पोस्ट ऑफिसमध्ये छोट्या रकमेपासून मोठ्या रकमेपर्यंत गुंतवणूक करता येते. यासोबतच पोस्ट ऑफिस योजनांमध्ये (Post Office Schemes) केलेली गुंतवणूक जोखीममुक्त असते आणि रिटर्नही चांगला मिळतो. अशा स्थितीत जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक (Investment In Post Office) केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. (Post Office Transaction Rules)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोस्ट ऑफिस खात्यात पॅन क्रमांक आणि मोबाइल क्रमांक अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. हे अपडेट न केल्यास, तुम्ही पोस्ट ऑफिस खात्यातून मर्यादेतच पैसे काढू शकाल.

 

कोणत्या कारणासाठी बनवला नियम –
भारतीय पोस्ट विभागाने (Indian Post) 13 जानेवारी 2022 रोजी सर्व पोस्ट ऑफिस खात्यांमध्ये पॅन आणि मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी एक परिपत्रक जारी केले होते. ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की देशभरात असलेल्या पोस्ट ऑफिस ग्राहकांनी त्यांच्या खात्यात त्यांचा पॅन नंबर आणि मोबाइल नंबर अपडेट करणे आवश्यक आहे. ज्याद्वारे पोस्ट ऑफिसला फसवणूक थांबवायची आहे. (Post Office Transaction Rules)

नवीन सुविधेअंतर्गत, पोस्ट ऑफिसमधून पैसे काढल्यास, तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल आणि त्यानंतरच पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

 

या सेवांमध्ये OTP देखील वापरला जाईल –
OTP आणि मोबाईल नंबर पैशांचे व्यवहार, कर्ज परतफेड, खाते उघडणे आणि बंद करणे यासारख्या सर्व प्रक्रियांसाठी वापरला जाईल.

पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांसाठी हे बंधनकारक केले आहे की 20,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेची देवाण-घेवाण करताना तुमच्या खात्यात मोबाईल नंबर आणि पॅन नंबर अपडेट करणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही 20,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करू शकणार नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोस्ट ऑफिसमध्ये पूर्ण करावी केवायसी –
ज्या लोकांची पोस्ट ऑफिसमध्ये खाती आहेत त्यांचे खाते सुरळीत चालू राहण्यासाठी त्यांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यासाठी तुम्हाला पॅन कार्ड (PAN Card), आधार कार्ड (Aadhaar Card) आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल. त्यानंतर पोस्ट ऑफिस खात्यातून व्यवहार करता येईल.

 

हा फॉर्म भरून करावे लागेल केवायसी –
जर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्या खात्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची असेल यासाठी तुम्हाला SB103 किंवा SB 7/7A/7B/7C हा फॉर्म भरावा लागेल.
यासोबतच पॅन, आधार आणि मोबाईल नंबर अपडेट करावे लागणार आहेत.
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही पोस्ट ऑफिस खात्यात पूर्वीप्रमाणे व्यवहार करू शकाल.

 

Web Title :- Post Office Transaction Rules | post office more than 20 thousand rupees transaction given these documents

 

हे देखील वाचा :

Eggs Health Benefits | चाळीशीनंतर अंडे खाणे आरोग्यासाठी योग्य आहे का? जाणून घ्या सविस्तर

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांनी केवळ 10 मिनिटात टाटा समुहाच्या 2 शेयरमधून कमावले 186 कोटी, जाणून घ्या कसे

LIC Kanyadan Scheme | मुलीच्या विवाहासाठी मिळतील 31 लाख रुपये, केवळ जमा करावे लागतील 151 रुपये

Vijay Wadettiwar | खुशखबर ! राज्य सरकारतर्फे व्यवसायासाठी मिळतंय 1 लाखाचे बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या स्वरुप व कोण असेल पात्र

 

Related Posts