IMPIMP

Prakash Ambedkar | ‘बिगर भाजप सरकार सत्तेत येऊ द्या, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना तुरूंगात टाकल्याशिवाय राहणार नाही;’ प्रकाश आंबेडकर यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

by nagesh
Prakash Ambedkar | prakash ambedkar controvarsial speech on pm narendra modi at pune

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Prakash Ambedkar | देशाचा मालक असलेला मतदार भीतीपोटी नोकर झालाय आणि नोकर मालक झालाय. अशी परिस्थिती सध्या देशात आहे. २०२४ मध्ये बिगर भाजप-आरएसएसचे (BJP-RSS) सरकार येऊ द्या. अमित शहा (Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना तुरूंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. असे मत वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी खडकवासला येथील सभेत बोलताना व्यक्त केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, ‘जर याच ठिकाणी बीबीसीचा माहितीपट (BBC Documentary) आपण दाखवला असता तर उपस्थित सर्वांनाच पोलिस पकडू शकतील का? जर पकडले तर एवढ्या लोकांना तुरूंगात ठेवायला जागा आहे का? झुकाने वाला चाहिए सरकार झुकती है. असे म्हणत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) भाजप सरकारला पायउतार करा. असे आवाहन यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना केले.

 

तर खडकवासला येथे आयोजीत सभेत पुढे बोलताना ते म्हणाले, ‘देशाचे माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या काळात देशातील सोने बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहान ठेवले होते. मी अनेकदा विचारले की, ते सोने परत आणले का? पण त्यावर कोणी उत्तर देत नाही. यावरून देशाची परिस्थिती काय आहे ते बघा. आपल्या घरातले सोने आपण जेव्हा गहान ठेवतो आणि ते सोडवता येत नाही. त्यावरून आपले घर आर्थिकदृष्ट्या दुबळे असल्याचा निष्कर्ष काढला जातो. एखादा दारूडा अशावेळी आपली भांडीकुंडी विकून घर चालवतो. सगळं विकून झालं की दारूडा आपलं घरंही विकून टाकतो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके तेच करत आहेत की नाही ते सांगा?’ असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) पंडित जवाहरलाल नेहरू यांचे कौतुक केले.
डॉ. होमीभाभा (Dr. Homibhabha) यांच्या संशोधनाच्या आधारावर नेहरूंनी देशात जे कारखाने उभे केले आहेत.
तेच आज देशाचा आर्थिक कणा बनलेत. मात्र हेच कारखाने पंतप्रधान नरेंद्र मोदी दारूड्यासारखे विकायला लागले आहेत. असा घणाघात यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्ज काढून देश चालवत आहेत. देशातील कारखाने विक्रीचा सपाटा त्यांनी लावला आहे.
त्यांनी माझ्याबरोबर एकाच व्यासपीठावर बसून माझ्या चार प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
किंवा मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी तरी समोर यावे.
असे खुले आवाहन भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक मोहन भागवत यांना यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

 

ज्या वाझेने अंबानी यांच्या घराच्या परिसरात जिवंत बॉंब ठेवले होते.
त्याच वाझेला आता माफीचा साक्षीदार केला जाणार आहे.
आपल्याला चाकू मारणाऱ्याला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच आरोपीला माफीचा साक्षीदार केल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल का? हेच अंबानीच्या लक्षात आले आहे.
मोदींच्या व्यवस्थेत आपल्याला न्याय मिळणार नाही, त्यामुळे ते देशचं सोडून गेले.
आज देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीसोबत कायद्याची ही अवस्था आहे. अशी टीका यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर केली.

 

Web Title :- Prakash Ambedkar | prakash ambedkar controvarsial speech on pm narendra modi at pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | डोक्यात बिअरची बाटली मारुन तरुणाला लुटले; कर्वेनगरमधील घटना

Ahmednagar ACB Trap | 30 हजार रुपये लाच घेताना दोन लेखा अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts