IMPIMP

President’s Police Medal | मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह राज्यातील चार पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

by nagesh
President's Police Medal | presidents police medal four policemen of the state including deven bharti received presidents police medal 74 medals for maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – President’s Police Medal | राष्ट्रपती पोलीस पदकांची बुधवारी (दि.25) घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील 74 जणांना पदकं जाहीर झाली आहेत. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती (Mumbai Special CP Deven Bharti) यांच्यासह चार पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (President’s Police Medal) मिळाले आहे. तसेच 31 जणांना पौलीस ‘शौर्यपदक’ तर 39 जणांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) एक दिवस आधी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यांना मिळाले राष्ट्रपती पोलीस पदक

महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रपती पोलीस पदक (President’s Police Medal) मिळवलेल्या चार पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती (IPS Deven Bharti), महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह (Additional Director General of Police Anup Kumar Singh), मुंबईतील पोलीस (Mumbai Police) उपनिरीक्षक (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई) संभाजी देशमुख (PSI Sambhaji Deshmukh) आणि ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव (PSI Deepak Jadhav) यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. तर 31 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित केले जाणार आहे.

 

901 पोलिसांना पदकं जाहीर

देशातील विविध राज्यांतील एकूण 901 पोलिसांना पोलीस पदकं जाहीर झाली आहेत. 140 जणांना शौर्य पोलीस पदक (Police Medal for Gallantry), 93 जणांना राष्ट्रपती पोलीस पदक (President’s Police Medal for Distinguished Service ) आणि 668 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (Police Medal for Meritorious Service) जाहीर झाले आहे. 40 शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक पुरस्कार अतिरेकी प्रभावित भागात काम करणाऱ्या 80 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर जम्मू आणि काश्मीर प्रदेशात कार्यरत 45 जवानांना सन्मानित केले जाणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोण आहेत देवेन भारती?

देवेंद्र फडणवीस सरकारच्या (Devendra Fadnavis Government) काळातील सर्वात प्रभावी
अधिकारी देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 2014-2019 या दरम्यान
फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुंबईतील प्रभावी पोलीस अधिकारी म्हणून त्यांना ओळखले
जात होते. त्यावेळी ते सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) होते.
त्यानंतर त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देऊन दहशतवाद विरोधी पथकात त्यांनी नियुक्ती करण्यात आली.

 

त्यानंतर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात आयपीएस अधिकाऱ्यांसाठी सर्वांत कमी
दर्जाची असाइन्मेंट समजल्या जाणाऱ्या स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदावरुन
देवेन भारती यांना हटवण्यात आले. 13 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्याजागी सहआयुक्त (वाहतूक) राजवर्धन
यांची नियुक्ती करण्यात आली आणि तेव्हापासून ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. राज्यात शिंदे फडणवीस सरकार
आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या इतिहासात विशेष पोलीस आयुक्त या पदाची पहिल्यांदाच निर्मिती करुन
देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- President’s Police Medal | presidents police medal four policemen of the state including deven bharti received presidents police medal 74 medals for maharashtra

 

हे देखील वाचा :

Nandurbar Crime News | नंदुरबारमध्ये ‘पुष्पा’ स्टाईलने सागाची तस्करी; जमिनीखाली गाडली होती सागाची लाकडे

Cabinet Expansion | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाताच, आमदारांना लागले मंत्रीपदाचे वेध

Pune Crime News | 500 रुपयासाठी व्यावसायिकाचा सपासप वार करुन खून, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पुणे जिल्ह्यातील घटना

 

Related Posts