IMPIMP

PT Usha-Indian Olympic Association | धावपटू पी. टी. उषा ‘आयओए’ची पहिली महिला अध्यक्ष

by nagesh
PT Usha-Indian Olympic Association | pt usha become first women president of indian olympic association

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – PT Usha-Indian Olympic Association | भारताची माजी अव्वल धावपटू ‘पायोली एक्सप्रेस’ अशी ज्यांची ओळख आहे अश्या पी. टी. उषा भारतीय ऑलिम्पिक संघटनेची (आयओए) पहिली महिला अध्यक्ष होणार आहे. या पदासाठी फक्त केवळ पी.टी. उषा यांनीच अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. (PT Usha-Indian Olympic Association)

 

भारतीय ऑलिम्पिक संघटनेची (आयओए) निवडणूक येत्या 10 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. अर्ज भरण्याची अखेरची मुदत संपल्यानंतर अध्यक्षपदासाठी केवळ पी. टी. उषा यांचाच अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात असून केवळ त्यावर आता शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी 25 ते 27 नोव्हेंबर अशी तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. अखेरच्या दिवशी विविध पदासाठी 24 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. (PT Usha-Indian Olympic Association)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोणत्या पदासाठी किती जागा?
अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष (1 जागा), दोन उपाध्यक्ष (एक पुरुष, एक महिला), कोषाध्यक्ष (1 जागा), सह सचिव (एक पुरुष, एक महिला), कार्यकारी परिषद (6 जागा, यातील दोन जागा सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या दोन खेळाडूंसाठी राखीव, एक पुरुष-एक महिला), कार्यकारी परिषदेमध्ये दोन सदस्य खेळाडू समितीमधील असणार आहेत. त्यामुळे आता या जागेसाठी कोणाची वर्णी लागणार हे 10 डिसेंबर रोजी पार पडणाऱ्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.

 

Web Title :- PT Usha-Indian Olympic Association | pt usha become first women president of indian olympic association

 

हे देखील वाचा :

BCCI-Guinness Book Of World Record | गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचा मोठा विश्वविक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली दखल

Sanjay Raut | संभाजीराजे आणि उदयनराजे यांची मागणी म्हणजे लोकभावना’; संजय राऊत यांचे वक्तव्य

Yami Gautam | यामीला बनायचे होते IAS पण वडिलांच्या ‘त्या’ मैत्रिणीमुळे घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय

 

Related Posts