IMPIMP

Pune Band News | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात पुणे बंदची हाक ! विविध पक्ष व संघटनांतर्फे 13 डिसेंबरला पुणे बंद आंदोलन

by nagesh
MPSC Students Protest in Pune | mpsc students protest in pune to avoid new syllabus in 2023 and other seeking

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Band News | महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अपमानकारक भाष्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात पुणे बंदची हाक (Pune Closed Down) विविध संघटनांनी एकत्र येत दिली आहे. येत्या 13 डिसेंबर रोजी संभाजी ब्रिगेड आणि इतर शिवप्रेमी संघटना पुणे बंद आंदोलन करणार आहे. (Pune Band News)

 

पुण्यातील एसएसपीएम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बुधवारी राज्यातील विविध पक्ष आणि संस्थांची एक बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यात आला. त्यामुळे मंगळवार 13 डिसेंबर रोजी पुणे बंद ठेवण्याचा निर्णय याप्रसंगी एकमताने मान्य झाला. संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी याविषयी माहिती दिली आहे. शिवप्रेमींच्या वतीने सर्वानुमते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ 13 डिसेंबर रोजी पुणे बंदचा निर्णय घेण्यात आला. शिवप्रेमींनी संविधानिक पद्धतीने स्वयंप्रेरणेने या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिंदे यांच्याकडून यावेळी करण्यात आले. (Pune Band News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मागील अनेक दिवस राज्यात शिवाजी महाराजांवर अपमानकारक बोलले जात आहे. या सर्वात भाजपचे नेते आणि राज्यपालांचा समावेश आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. महाविकास आघाडीने विविध आंदोलने आणि निदर्शने करून राज्यपालांचा आणि इतर भाजप नेत्यांचा निषेध केला होता. आता पुणे बंदचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Band News | call for pune bandh against governor in case of contempt of chhatrapati

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis-Amit Shah | शरद पवारांकडून अल्टिमेटम ! फडणवीसांकडून तातडीने गृहमंत्री अमित शहांना फोन, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हालचालींना वेग

Pune MNS | …. तर मलाही वसंत मोरेंची गरज नाही; नीलेश माझिरे यांची ‘त्या’ वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया

Jitendra Awhad | ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या दृश्यावर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप; म्हणाले – “मराठी माणसाला येड्यात काढताहेत”

 

Related Posts