IMPIMP

Devendra Fadnavis-Amit Shah | शरद पवारांकडून अल्टिमेटम ! फडणवीसांकडून तातडीने गृहमंत्री अमित शहांना फोन, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हालचालींना वेग

by nagesh
Devendra Fadnavis-Amit Shah | devendra fadnavis called union home minister amit shah to inform about the maharashtra karnataka border dispute

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Devendra Fadnavis-Amit Shah | कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली
आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न चिघळत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. पण, कर्नाटकात
मराठी माणसांवर आणि महाराष्ट्रातून गेलेल्या गाड्यांवर हल्ले सुरू आहेत. त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. पुढील
काही तासांत कर्नाटकमध्ये मराठी माणसांच्या वाहनांवर होत असलेले हल्ले थांबले नाहीत, तर मला बेळगावला जावे लागेल, असा इशारा पवारांनी दिला.
त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून चर्चा केली आहे. (Devendra Fadnavis-Amit Shah)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासोबत संवाद साधला आहे. कर्नाटक सरकारची मुजोरी आणि सीमाभागात महाराष्ट्रातील वाहनांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांना माहिती दिली. त्यानंतर शहा यांनी आपण या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घालणार असल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांना दिले. त्यामुळे महाराष्ट्रविरोधात सातत्याने वादग्रस्त विधाने करणाऱ्या बसवराज बोम्मई यांना अमित शहा समज देणार का, या वादावर पडदा पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Devendra Fadnavis-Amit Shah)

 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जत तालुक्यातील काही गावांवर दावा सांगितला होता. त्यावरून या वादाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत फोनवर सकारात्मक चर्चा केली आहे. पण, आता बोम्मई यांनी त्यांचा शब्द फिरवला आहे. त्यांनी त्यांच्या राज्यातील संघटनांना रोखले नाही. कन्नड रक्षक वेदिक संघटनेचे लोक महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले करत आहेत.

 

Web Title :- Devendra Fadnavis-Amit Shah | devendra fadnavis called union home minister amit shah to inform about the maharashtra karnataka border dispute

 

हे देखील वाचा :

Pune MNS | …. तर मलाही वसंत मोरेंची गरज नाही; नीलेश माझिरे यांची ‘त्या’ वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया

Sanjay Raut | ‘मंत्री महोदय, ही धमकी समजायची का?’ – संजय राऊत

Jitendra Awhad | ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या दृश्यावर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप; म्हणाले – “मराठी माणसाला येड्यात काढताहेत”

Maharashtra Karnataka Border Issue | कोल्हापूर कर्नाटक धावणाऱ्या एसटीच्या 660 फेऱ्या रद्द

 

Related Posts