IMPIMP

Pune BJP News | स्वाती शरद मोहोळ यांची भाजपा पुणे शहर महिला आघाडी सरचिटणीस पदी नियुक्ती

by sachinsitapure
Swati Sharad Mohol

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune BJP News | स्वारद फाऊंडेशनच्या (Swarad Foundation) संस्थापिका स्वाती शरद मोहोळ (Swati Sharad Mohol) यांची भाजपा (Pune BJP News) पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस (BJP Pune City Women’s Alliance General Secretary) पदी नियुक्ती करण्यात आली. पुणे शहर भाजप महिला शहराध्यक्षा हर्षदा फरांदे (Pune BJP Women City President Harshada Farande) यांनी राज्याचे उच्च व तंत्र-शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीमध्ये स्वाती मोहोळ यांना नियुक्तीचे पत्र दिले. स्वारद फांऊडेशन व ॐसाई मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित लकी ड्रॉ व होम मिनिस्टर (Lucky Draw and Home Minister) खेळ पैठणीचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 11 मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिसरातील दहा हजार महिलांनी सहभाग घेतला. याच कार्यक्रमात स्वाती मोहोळ यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. (Pune BJP News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

कार्यक्रमात शौर्य प्रशिक्षण वर्गातील मुलींचे प्रात्यक्षित दाखविण्यात आले. दुर्गा मातेच्या प्रतीक असणाऱ्या स्वच्छता कर्मचारी महिला, पारीचारीका महिला, अंगणवाडी सेविका महिला, पोलीस महिलांसाठी स्वतंत्र खेळ घेऊन बक्षिसे देण्याचा नाविण्यपुर्ण उपक्रमाचे चंद्रकांत पाटील यांनी विशेष कौतुक केले. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व शिवरायांची गारद म्हणून हिंदू धर्माच्या जयघोषात कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती मोहोळ व सुत्रसंचालन स्विकृत नगरसेवक वैभव मुरकुटे व स्वागत संदिप मोढवे यांनी केले. धर्म-जागरण च्या उल्का मोकासदार यांनी धर्म-देश प्रती मनोगत व्यक्त केले. भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे (BJP Pune City President Dheeraj Ghate) यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक सचिन भोसले, उद्योजक समिर पाटील, भाजपा
पुणे शहर सरचिटणीस पुनित जोशी, भाजपा कोथरूड अध्यक्ष संदिप बुटाला, युवा मोर्चा पुणे शहराध्यक्ष करण मिसाळ, नगरसेविका छाया मारणे, वासंती जाधव, वृषाली चौधरी, योगगुरू दिपक शिळीमकर, भाजपा महिला पदाधिकारी कांचन कुंबरे, अनिता तलाठी, पल्लवी गाडगीळ, सुप्रीया माझीरे, सुरेखा जगताप, निर्मला रायरीकर, तसेच भाजपा पदाधीकारी अभिजीत राऊत, अजय मारणे, गिरीष भेलके, नवनाथ जाधव, नंदकुमार गोसावी, पार्थ मटकरी, संतोष रायरीकर, अभिषेक कांगणे, प्रशांत दिवेकर, सौरभ शिंगाडे, प्रशांत थोपटे, शिवम देशपांडे, आशितोष वैश्यपायन, सुचित देशपांडे व भाजपा पदाधीकारी बहुसंख्येने उपस्थित होते. (Pune BJP News)

निवेदक विनोद पवार यांनी खेळात रंगत आणली, स्वारद फाऊंडेशन व ॐसाई मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी
कार्यक्रमाचे नियोजन करून महिलांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आनंदाच्या क्षणासाठी अनेक बक्षिसांचे वाटप
करून महिला-भगिनींचा आनंद द्विगुणीत करून ऐन दिवाळीच्या अगोदर दिवाळी साजरी करण्याचा योग जुळून आणला.

Related Posts