IMPIMP

Pune Bogus NA Order | पुण्यात बोगस NA ऑर्डर लावून दस्त नोंदणी करणाऱ्यांवर कारवाई करा, रोहन सुरवसे पाटील यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन

by nagesh
Pune Bogus NA Order | Take action against those who file bogus NA orders in Pune, Rohan Suravse Patil's statement to Revenue Minister

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  –  Pune Bogus NA Order | पुण्यात बोगस एनए ऑर्डर जोडून बोगस दस्त नोंदणी सुरू असून सर्वसामान्य नागरिांची फसवणूक होत आहे. यामुळे 11 अधिकाऱ्यांना यापूर्वी निलंबित केले असतानाही हे प्रकार थांबले नाहीत. मार्च महिन्यापासून बोगस एनए ऑर्डरवर (Pune Bogus NA Order) कोणतीही कारवाई न झाल्याने रोहन सुरवसे पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांची विधान भवन येथे भेट घेऊन याबाबत निवेदन दिले आहे.

 

हवेली क्रमांक 21 चे सह दुय्यम निबंधक वर्ग 2 चे संजय चव्हाण (Sanjay Chavan) यांनी तुकडे पाडून
दस्त नोंदणी केली. याबाबत तक्रार देऊन देखील कोणतीही कारवाई झाली नाही.
बोगस दस्त नोंदणी प्रकरणे शासन नियुक्त गठित केलेल्या समितीने दिलेल्या अहवालानुसार 11 अधिकारी निलंबित कोले. तर 9 जणांची विभागीय चौकशी व बदली करण्यात आली. परंतु सात महिने उलटून गेले तरी अद्याप पुणे येथे जुन्या ठिकाणी ते बेकायदेशीर दस्त नोंदणी करत आहेत. याबाबत सुरवसे पाटील यांनी महसूल मंत्र्यांना निवेदन दिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संजय चव्हाण यांची विशेष पथका मार्फत चौकशी करण्याची आणि एनए ऑर्डरवर तात्काळ गुन्हे (FIR)
दाखल करण्याचे आदेश देतो अथवा संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करणार असल्याचे विखे पाटील यांनी
यावेळी सांगितले.

 

Web Title :- Pune Bogus NA Order | Take action against those who file bogus NA orders in Pune, Rohan Suravse Patil’s statement to Revenue Minister

 

हे देखील वाचा :

Tejaswini Pandit | अभिनेत्री तेजस्विनी पंडितने दुनियादारी चित्रपटाबद्दल केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

Pune News | डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या NEMS पूर्व प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

Sanjay Raut | ‘याचा हिशोब 2024 मध्ये केला जाईल’; संजय राऊतांचा सोमय्यांना इशारा

 

Related Posts