IMPIMP

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल पाडणे आणि त्यानंतरच्या वाहतुकीबाबत NHAI चा आराखडा

by nagesh
Pune Chandani Chowk Bridge Demolition | The Chandni Chowk bridge will be demolished between October 1 and 2 at midnight

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याचा आराखडा एनएचएआयने तयार केला आहे. त्यानुसार नवीन उड्डाणपुलाच्या तीन मार्गिका सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये मुळशीकडून (Mulshi) येऊन बावधन (Bavdhan), कोथरूड (Kothrud), वारजेकडे (Warje) जाणे आणि हिंजवडी (Hinjewadi) , मुंबईच्या दिशेला जाणे शक्य होणार आहे. (Pune Chandani Chowk Bridge Demolition)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महामार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौक येथील उड्डाणपूल आणि सेवा रस्त्यांची कामे केली जात आहेत. येथील जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ३० टक्के काम जून २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्पाअंतर्गत येथील जुना अरुंद पूल पाडून त्या ठिकाणी ११५ मीटर लांब आणि ३६ मीटर रुंद नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी जुना पूल पाडण्यात येणार असून त्यानंतरची प्रस्तावित वाहतूक व्यवस्थेचे नियोजन एनएचएआयने केले आहे. त्यानुसार एनडीए, मुळशीकडून येऊन बावधन, पाषाण, वारजे आणि कोथरूडकडे जाणाऱ्यांनी नव्याने तयार केलेल्या उड्डाणपुलावरील मार्गिका (रॅम्प) एकचा वापर करावा लागणार आहे. (Pune Chandani Chowk Bridge Demolition)

 

एनडीए, मुळशीकडून येऊन मुंबईकडे जाणारी वाहतूक मार्गिका तीन आणि सात वरुन सोडण्यात येणार आहे. मुंबईकडून येऊन बावधन किंवा पाषाणला जाण्यासाठी महामार्गावरील पाषाण कनेक्टर रस्त्याने (विवा ईन हॉटेल) जाता येणार आहे. मुंबईकडून येऊन मुळशीकडे जाण्यासाठी कोथरूड भुयारी मार्गाने एनडीएचौक मार्गे वेदविहार, मुळशी, एनडीएला जाता येणार आहे. बावधन, पाषाणकडून वारजे, कात्रजकडे जाण्यासाठी पाषाण कनेक्टर रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. कोथरूड ते सातारा, वारजे ही वाहतूक सातारा महामार्गावरील सेवा रस्त्यावरील शृंगेरीमठा जवळून महामार्गावर वळविलेल्या मार्गाने जाणार आहे. वारजे, साताऱ्याकडून येऊन पाषाण, बावधनकडे जाणाऱ्यांना नवीन उड्डापुलाच्या मार्गिका सातवरून मुळशी रस्त्याला जाऊन मार्गिका एकवरून जावे लागणार आहे.

 

जुन्या पुलावरून सध्या मुळशी येथून पाषाण, बावधन आणि कोथरूड अशी एकेरी वाहतूक सुरू आहे.
हा पूल पाडल्यानंतर तातडीने तेथे नवीन पुलाचे काम सुरू केले जाणार आहे.
तसेच सेवा रस्त्यांची रखडलेली कामेही सुरू करता येणार आहे.
मात्र, तोपर्यंत वाहन चालकांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चांदणी चौकातील जूना पूल पाडणे आणि त्या काळात करण्यात येणाऱ्या वाहतुकीच्या नियोजनाबाबत NHAI ने प्रारूप आराखडा तयार केला आहे.
तो आराखडा पुणे, पिंपरी-चिंचवड पोलीसांना (Pimpri Chinchwad Police) पाठविण्यात आला आहे.
त्यांच्याकडून या आराखड्यावर काही सूचना असल्यास त्या स्वीकारून हा आराखडा अंतिम केला जाईल.

– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी (Pune Collector Dr. Rajesh Deshmukh)

 

 

Web Title :-  Pune Chandani Chowk Bridge Demolition | NHAI’s plan for demolition of Old flyover at Chandni Chowk and subsequent traffic

 

हे देखील वाचा :

Business Idea | केवळ 25,000 रुपयात सुरू करा हा सुपरहिट बिझनेस, दरमहिना होईल लाखो रुपयांची कमाई

Share Market | ‘या’ आठवड्यात कशी होईल शेअर मार्केटची वाटचाल? हे फॅक्टर लक्षात घेऊन करा गुंतवणूक

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून २५ वर्षाच्या तरुणाने 15 वर्षाच्या मुलीला केले गर्भवती; स्वारगेट पोलीस ठाण्यात FIR

 

Related Posts