IMPIMP

Share Market | ‘या’ आठवड्यात कशी होईल शेअर मार्केटची वाटचाल? हे फॅक्टर लक्षात घेऊन करा गुंतवणूक

by nagesh
 Share Market | how will the stock market move this week invest by keeping these factors in mind

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Share Market | शेअर मार्केटची दिशा या आठवड्यात अनेक आर्थिक आकड्यांच्या घोषणा आणि जागतिक ट्रेंडच्या आधारावर ठरेल, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. या आठवड्यात सोमवारी जुलैचे औद्योगिक उत्पादनाचे (आयआयपी) आकडे येणार आहे. तर, बुधवारी घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाईची आकडेवारी येईल. (Share Market)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले, या आठवड्यात बाजाराची दिशा जागतिक बाजाराच्या निकालाशिवाय काही महत्त्वाचे आर्थिक आकडे ठरवतील. आठवड्यादरम्यान महागाई व्यतिरिक्त, उत्पादन आणि औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी येणार आहे. (Share Market)

 

तज्ञ काय म्हणतात?
सॅमको सिक्युरिटीजचे अपूर्व सेठ म्हणाले, जागतिक बाजाराला अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीची आतुरता आहे. सर्वांच्या नजरा या आकड्यांवर असतील, कारण त्याच्या आधारेच समजेल की पुढे फेडरल रिझर्व्हचा कोणता कल असेल. (Stock Market Marathi News)

 

कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्च हेड (रिटेल) श्रीकांत चौहान म्हणाले की, कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा कल बाजाराची धारणा प्रभावित करेल. (Share Market Marathi News)

 

मागील आठवड्यात कसा होता बाजार?
मागील आठवड्यात, बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 989.81 अंक किंवा 1.68 टक्क्यांनी लाभात राहिला.
दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 293.90 अंकांनी वाढून 1.67 टक्क्यांवर पोहोचला.
रेलिगेअर ब्रोकिंग उपाध्यक्ष अजित मिश्रा यांचे म्हणणे आहे की, बाजारात आता तेजीचा कल कायम राहील.
सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदीचा कल दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Share Market | how will the stock market move this week invest by keeping these factors in mind

 

हे देखील वाचा :

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून २५ वर्षाच्या तरुणाने 15 वर्षाच्या मुलीला केले गर्भवती; स्वारगेट पोलीस ठाण्यात FIR

Pune Pimpri Crime | जमीन खरेदी प्रकरणात बिल्डरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Uday Samant | उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारु, काँग्रेस नेत्यासमोर रिफायनरी विरोधकाची धमकी

 

Related Posts