IMPIMP

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना धक्का, बारामतीमधील प्रस्तावित प्रकल्प रद्द

by nagesh
CM Eknath Shinde | cm eknath shinde decided to cancel the leopard safari project in baramati set back for ncp ajit pawar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यकाळात
बारामती होणारा प्रकल्प रद्द केला आहे. जुन्नर तालुक्यातील प्रस्तावित असणारा बिबट्या सफारी प्रकल्प बारामतीत (Leopard Safari Project
Baramati) नेण्याच्या हालचाली महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात करण्यात आल्या होत्या. परंतु
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आता हा प्रकल्पाचा प्रस्ताव रद्द (Proposal Cancelled) केला असून हा प्रकल्प जुन्नर
तालुक्यातील आंबेगव्हाण (Junnar Taluk,Ambegwan) या ठिकाणीच होणार असल्याचे सांगितलं आहे. याबाबतची माहिती शिंदे यांनी ट्विट करुन दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यात सत्तांतर होताच महाविकास आघाडी सरकारे घेतलेले वेगवेगळे निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून (Shinde-Fadnavis Government) रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. त्यातच अजित पवारांचा आणखी एक निर्णय रद्द करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीला (NCP) धक्का दिला आहे. शिंदे यांनी हा निर्णय घेऊन एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे. शिंदे गटात सामिल झालेले माजी आमदार शरद सोनवणे (Former MLA Sharad Sonwane) यांच्या मागणीला यश आले आहे. बारामतील बिबट्या सफारी प्रकल्प नेण्याचे रद्द करुन जुन्नरच्या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे.

 

 

बिबट्या सफारी प्रकल्प जुन्नर तालुक्यात प्रस्तावित होता. मात्र, अजित पवार यांनी हा प्रकल्प बारामतीला
हलवण्याच्या हालचाली सुरु केल्या. तसेच हा प्रकल्प बारामतीला उभारण्यात येईल अशी घोषणा अर्थसंकल्पात केली होती. यासाठी अजित पवारांनी बारामती तालुक्यातील गाडिखेल याठिकाणी 100 हेक्टर जागा राखीव ठेवली होती.
तसेच 60 कोटी रुपयांची तरतूद केली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

परंतु जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Junnar MLA Atul Benke) यांनी याबाबत अधिवेशनात आवाज उठवला होता.
मात्र अजित पवार यांनी बारामती आणि जुन्नर या दोन्ही ठिकाणी हा प्रकल्प केला जाईल, असे स्पष्ट केले होते.
मात्र आता सत्ताबदल झाल्यानंतर अजित पवार यांनी घेतलेला बिबट्या सफारी प्रकल्प बारामतीला उभारण्याचा
निर्णय शिंदे सरकारकडून रद्द करण्यात आला आहे.

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde decided to cancel the leopard safari project in baramati set back for ncp ajit pawar

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | CM शिंदे – उदय सामंत यांनी केलेले आरोप हे शहाणपणाचे लक्षण नाही, शरद पवारांनी राज्य सरकारवर केली खोचक टीका

Narayan Rane On Sharad Pawar | गप्प बसा, राज्य सांभाळायला आम्ही…, शरद पवार यांना नारायण राणेंचे प्रत्युत्तर!

Pune Crime | सराईत गुन्हेगाराने केली हॉटेलची तोडफोड; किरकटवाडी फाटा येथील घटना

 

Related Posts