IMPIMP

Pune City Street Vendors Committee Election | पुण्यातील नगर पथविक्रेता समिती निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत जाहीर

by nagesh
Pune City Street Vendors Committee Election | Pune Municipal Road Vendor Committee Election Reservation Lottery Announced

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune City Street Vendors Committee Election | नगर पथविक्रेता समितीच्या रचनेनुसार पथविक्रेता संवर्गातून आठ पथविक्रेता प्रतिनिधींची नेमणूक निवडणुकीद्वारे केली जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक कामगार आयुक्त विशाल घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सोडत पद्धतीने आरक्षण (Pune City Street Vendors Committee Election) निश्चित करण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

निश्चित करण्यात आलेले आरक्षण खालील प्रमाणे

1. सर्वसाधारण गटाकरिता (महिला राखीव-1) -3
2. अनुसूचित जाती (महिला राखीव) – 1
3. अनुसूचित जमाती – 1
4. इतर मागासवर्ग गट – 1
5. अल्पसंख्याक (महिला राखीव) -1
6. विकलांग गट – 1

 

या प्रवर्गातून नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली आहेत. (Pune City Street Vendors Committee Election)

1. सर्वसाधारण गट – एकूण 29 नामनिर्देश पत्र प्राप्त झाली असून त्यापैकी 2 अपात्र तर 27 पात्र झाले आहेत. त्यापैकी 6 उमेदवारांनी माघार घेतली आहे. या गटातून 2 जागांसाठी 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

2. सर्वसाधारण महिला राखीव गट – एकूण 8 नामनिर्देश पत्र प्राप्त झाली असून त्यापैकी 2 अपात्र तर 6 पात्र झाले आहेत. त्यापैकी एका उमेदवारांनी माघार घेतली आहे. या गटातून एका जागेसाठी 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

3. अनुसूचित जाती जाती महिला राखीव गट – एकूण 3 नामनिर्देश पत्र प्राप्त झाली असून सर्व पात्र झाले आहेत. या गटातून एका जागेसाठी 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

4. अनुसूचित जमाती गट – एकूण 3 नामनिर्देश पत्र प्राप्त झाली असून त्यापैकी 2 अपात्र तर 1 पात्र झाले आहेत. या गटात एक जागा असून पात्र असलेला उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.

5. इतर मागासवर्ग गट – एकूण 4 नामनिर्देश पत्र प्राप्त झाली असून त्यापैकी 2 अपात्र तर 2 पात्र झाले आहेत. या गटातून एका जागेसाठी 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

6. अल्पसंख्यांक महिला राखीव गट – एकूण 3 नामनिर्देश पत्र प्राप्त झाली असून सर्व पात्र झाले आहेत.
या गटातून एका जागेसाठी 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

7. विकलांग गट – एकूण 3 नामनिर्देश पत्र प्राप्त झाली असून त्यापैकी 1 अपात्र तर 2 पात्र झाले आहेत.
या गटातून एका जागेसाठी 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

या गटातील पात्र उमेदवारांना मंगळवारी (दि.22) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले आहे.
मतदान प्रक्रिया 4 डिसेंबर 2022 रोजी पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्य़ालयांतर्गत असलेल्या 32
केंद्रावर होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 5 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune City Street Vendors Committee Election | Pune Municipal Road Vendor Committee Election Reservation Lottery Announced

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut On Shinde-Fadnavis Government | शिंदे सरकारला लवकर घालवले नाही तर महाराष्ट्राचे 5 तुकडे पडतील

Abhishek Bachchan-Karisma Kapoor Breakup | ‘या’ कारणामुळं मोडला होता अभिषेक आणि करिष्माचा साखरपूडा; अनेक वर्षांनी कारण आलं समोर

Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेचा अग्निपरीक्षेचा टप्पा उद्यापासून सुरु; प्रियंका गांधी मैदानात

 

Related Posts