IMPIMP

Sanjay Raut On Shinde-Fadnavis Government | शिंदे सरकारला लवकर घालवले नाही तर महाराष्ट्राचे 5 तुकडे पडतील

by nagesh
Sanjay Raut | sanjay raut target eknath shinde devendra fadnavis for canceling davos tour due to pm narendra modi mumbai visit

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – Sanjay Raut On Shinde-Fadnavis Government | राज्यातील शिंदे सरकार लवकर घालवले नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पडतील, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. कर्नाटक सरकारकडून सांगली जिल्ह्यातील ‘जत’ तालुक्यावर दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते. (Sanjay Raut On Shinde-Fadnavis Government)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बेळगाव सीमाप्रश्न पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. बेळगाव सीमाप्रश्नावर नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांची एक बैठक घेतली. तरी देखील कर्नाटक सरकारकडून अशी भाषा बोलली जात आहे. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले आहे का, असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) आतापर्यंत सीमा भागातील प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. ते महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना पाठिशी घालतात, ते काय सीमा भागातील लोकांना न्याय देणार आहेत. कर्नाटकात भाजपचे मुख्यमंत्री आहे. इथे भाजपशासित शिंदे सरकार आहे. दोघांच्या संगनमताने केंद्र सरकारला महाराष्ट्राचे पाच तुकडे करायचे आहेत. कोणाला मुंबई तोडायची आहे, तर कोणाकडून महाराष्ट्र कुरतडण्याचे काम सुरु आहे, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. (Sanjay Raut On Shinde-Fadnavis Government)

 

राज्यात सीमाप्रश्न महत्वाचा आहे. कर्नाटकाकडून राज्याच्या एका तालुक्यावर दावा केला जात आहे.
आणि राज्याचे मुख्यमंत्री 50 आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघाले आहेत.
आता उद्या आसामच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर दावा केला नाही म्हणजे मिळवले.
त्यामुळे राज्यातील हे भाजप शिंदे सरकार लवकरात लवकर घालवले पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sanjay Raut On Shinde-Fadnavis Government | sanjay raut says dismiss the shinde government soon or else maharashtra will be divided into five parts

 

हे देखील वाचा :

Abhishek Bachchan-Karisma Kapoor Breakup | ‘या’ कारणामुळं मोडला होता अभिषेक आणि करिष्माचा साखरपूडा; अनेक वर्षांनी कारण आलं समोर

Pune Crime | पर्वती टेकडीवर भर दुपारी युगलाला कोयत्याच्या धाकाने लुबाडले; मित्राच्या डोक्यात कोयत्या मारुन केले जबर जखमी

T20 World Cup 2024 | ICC कडून टी-20 विश्वचषक 2024 च्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल; जाणून घ्या

 

Related Posts