IMPIMP

Pune Corona | चिंताजनक ! नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात तब्बल 412 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Comfortable! Discharge of 5521 patients of 'Corona' in the last 24 hours in Pune city, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुण्यात कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच दररोज कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचे (Omycron Variant) रुग्ण आढळून येत असल्याने चिंता अधिक वाढली आहे. आज वर्षाचा शेवटचा दिवस असून सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची तयारी केली जात असताना नवर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. आज दिवसभरात पुण्यात तब्बल 412 नवीन कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 95 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही वाढत आहे. तसेच ओमिक्रॉन व्हेरियंटने देखील चिंता वाढवली आहे. पुण्यात आजपर्यंत 5 लाख 10 हजार 218 रुग्णांनी कोरोनावर (Pune Corona) मात केली आहे. तर 4 लाख 99 हजार 303 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज पुणे शहराबाहेरील 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत शहरात 9 हजार 116 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 1799 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 92 रुग्ण गंभीर आहेत. तर 56 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6944 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 38 लाख 65 हजार 113 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (PMC Health Department)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रुग्णसंख्या वाढत असली तरी आम्ही लक्ष ठेवून आहोत. बहुतांश रुग्ण हे सौम्य लक्षण असलेले आहेत. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या देखील कमी आहे. आम्ही अन्य बाबतीतही तयारी करत आहोत. लसीकरण वाढवण्याबाबत ही आमचे प्रयत्न सुरू आहेत.

– विक्रम कुमार, महापालिका आयुक्त
(pmc commissioner vikram kumar)

 

Web Title : Pune Corona | Worrying! Corona outbreak in Pune on New Year’s Eve, 412 new patients in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | हनी ट्रॅप ! खंडणी मागणाऱ्या महिलेला वाकड पोलिसांकडून अटक

WhatsApp Messages | व्हॉट्सअ‍ॅपवरुन विनाग्रुप 250 लोकांना पाठवू शकता नववर्षाच्या शुभेच्छा; जाणून घ्या सोपा मार्ग

Devendra Fadnavis | ‘मतदारांनी सारं काही झुगारुन लोकशाही निवडली’, सिंधुदुर्ग जिल्हा बँक विजयावर फडणवीसांचे मोजकं, पण सूचक विधान

 

Related Posts