IMPIMP

Pune Crime | हनी ट्रॅप ! खंडणी मागणाऱ्या महिलेला वाकड पोलिसांकडून अटक

by nagesh
Woman Arrest

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे चॅटिंग व संभाषण करुन जवळीक साधून खंडणी (Ransom) उकळणाऱ्या एका महिलेला पुण्यातील (Pune Crime) वाकड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. वाकड पोलिस ठाण्यातील (Wakad police station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई रहाटणी येथील शिवार चौकात (Shivar Chowk) केली. सविता अभिमान सुर्यवंशी (वय-40 रा. ताडीवाला रोड झोपडपट्टी, ली मेरिडियन हॉटेलच्या Le Meridien Hotel मागे, ल्युम्बीनी नगर, पुणे) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे (Pune Crime) नाव आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी सखाराम नारायण नखाते Sakharam Narayan Nakhate (वय-54 रा. नखातेवस्ती, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.30) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सविता हिने सखाराम नखाते यांना त्यांच्यात झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग, मॅसेजेस असल्याचे सांगितले. ते मेसेज फिर्यादी यांच्या घरी, त्यांच्या सोसायटीतील लोकांना दाखवून समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. मुलींना फसवतो, अशी सोशल मीडियावर बदनामी (Defamation on Social Media) करुन, स्वत: आत्महत्या (Suicide) करुन गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. (Pune Crime)

 

हे प्रकरण मिटवण्यासाठी आरोपी सविताने फिर्यादी यांच्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. वाकड पोलिसांनी सापळा रचून तक्रारदार यांना आरोपी महिलेला तिने मागणी केल्याप्रमाणे पैसे तयारी दाखवून महिलेला पैसे घेण्यासाठी बोलावून घेतले. पोलिसांनी भारतीय चलनातील 2000 च्या 12 नोटा व कोरे कागदी 6 बंडल तयार करुन तक्रारदार यांच्याकडे दिले. रहाणटी येथील शिवार गार्डन हॉटेलमध्ये तक्रारदार यांच्याकडून खंडणीची रक्कम घेताना दुपारी एकच्या सुमारास अटक केली. महिलेला न्यायालयात हजर केले असता 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash), अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे (Addl CP Sanjay Shinde),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आनंद भोईटे (DCP Anand Bhoite), सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले (ACP Shrikant Disley)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर (Senior Police Inspector Dr. Vivek Mugalikar),
पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष पाटील (Police Inspector Santosh Patil), सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव (API Abhijeet Jadhav),
पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल (PSI Ganesh Torgal), पोलीस अंमलदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे,
बापूसाहेब धुमाळ, वंदु गिरे, बाबा चव्हाण, अतिक शेख, प्रशांत गिलबिले, प्रमोद कदम, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, दिपक साबळे,
अतिष जाधव, कल्पेश पाटील व कौतेय खराडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Honey Trap! Wakad police arrest woman seeking ransom

 

हे देखील वाचा :

WhatsApp Messages | व्हॉट्सअ‍ॅपवरुन विनाग्रुप 250 लोकांना पाठवू शकता नववर्षाच्या शुभेच्छा; जाणून घ्या सोपा मार्ग

Devendra Fadnavis | ‘मतदारांनी सारं काही झुगारुन लोकशाही निवडली’, सिंधुदुर्ग जिल्हा बँक विजयावर फडणवीसांचे मोजकं, पण सूचक विधान

Maharashtra Lockdown Again | महाराष्ट्रात पुन्हा लागणार का लॉकडाऊन?, आरोग्य मंत्र्यांनी केले मोठे वक्तव्य

 

Related Posts