IMPIMP

Pune Corona | चिंताजनक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात नवीन कोरोना रूग्णांची संख्या 300 च्या टप्प्यात, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona | Worrying ! The number of new corona patients in Pune city has reached 300 in the last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज (गुरुवार) पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या तिनशेच्या आसपास आली आहे. त्यातच ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून येत असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona) 298 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 33 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 09 हजार 806 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 99 हजार 208 इतके
रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 03 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 01 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 116 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 1482 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 89 रुग्ण गंभीर आहेत. तर 60 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6160 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 38 लाख 58 हजार 169 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (PMC Health Department)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Corona | Worrying ! The number of new corona patients in Pune city has reached 300 in the last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

EPFO e-Nomination | EPFO ने वाढवली ई-नॉमिनेशन सबमिट करण्याची शेवटची तारीख, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Mumbai Lockdown News | ‘…तर मग मुंबईत Lockdown लागणार’; राजेश टोपेंनी दिले संकेत

खुशखबर ! RBI ने बँक ग्राहकांसाठी वाढवला KYC चा कालावधी, जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts