IMPIMP

Mumbai Lockdown News | ‘…तर मग मुंबईत Lockdown लागणार’; राजेश टोपेंनी दिले संकेत

by nagesh
Mumbai Lockdown News | when will lockdown imposed in mumbai and maharashtra rajesh tope made statement on it

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai Lockdown News | राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांचे (Corona virus) प्रमाण वाढताना दिसत आहे. यामुळे राज्यात चिंताजनक वातावरण निर्माण झालं आहे. यातच मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये दैनंदिन वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईची चिंता लागून राहिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत 7 जानेवारी पर्यंत जमावबंदी लागू केली आहे. मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी लॉकडाऊनबाबत (Mumbai Lockdown News) महत्वाचे संकेत दिले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुंबईत झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येवर राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. मागील 2 वर्ष कोरोनामध्येच गेल्यामुळे हा नवीन वर्ष तरी काही नवीन घेऊन येईल. असे लोकांना वाटत होते. मात्र राजेश टोपे यांच्या लॉकडाऊनच्या संकेतामुळे (Mumbai Lockdown News) लोकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. दरम्यान, कोविड पॉझिटिव्हिटीचा दर (Covid Positive) 5 टक्क्यांपेक्षा जास्त झाला तर राज्य सरकारला (Maharashtra Government) निर्बंध परत आणण्याचा विचार करावा लागेल. याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) लवकरच कोविड टास्क फोर्सची बैठक घेणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं आहे.

‘राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब आहे. मुंबईचा सध्याचा सकारात्मकता दर 4 टक्के आहे. जर हा दर 5 टक्केच्या वर गेला तर सर्वत्र बंदी घालण्याचा विचार करावा लागेल.’ असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, टोपे यांच्या अशा वक्तव्यानंतर मुंबईमध्ये केव्हापासून लॉकडाऊन लागू शकतो याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Mumbai Lockdown News | when will lockdown imposed in mumbai and maharashtra rajesh tope made statement on it

 

हे देखील वाचा :

खुशखबर ! RBI ने बँक ग्राहकांसाठी वाढवला KYC चा कालावधी, जाणून घ्या सविस्तर

7th Pay Commission | नववर्षात सरकारी कर्मचार्‍यांच्या किमान वेतनात होणार मोठी वाढ! 35,510 रुपयांपर्यंत वाढणार

India Vs South Africa 2021 | ऐतिहासिक क्षण ! भारताने पहिला कसोटी सामना जिंकला; दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा

 

Related Posts