IMPIMP

खुशखबर ! RBI ने बँक ग्राहकांसाठी वाढवला KYC चा कालावधी, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Recurring Payments | reserve bank of india hikes limit on auto debits from debit credit cards sans otp to rs 15000

नवी दिल्ली : वृत्तसंस्था RBI | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरुवारी बँकांमध्ये केवायसी अपडेटचा कालावधी तीन महिन्यांनी वाढवून 31 मार्च, 2022 केला. केंद्रीय बँकेने वाढता कोरोना संसर्ग पाहता (KYC) अपडेट करण्याची तारीख वाढवून 31 मार्च 2022 केली आहे.

 

ग्राहक KYC अपडेट करण्यासाठी डॉक्युमेंट ई-मेल किंवा पोस्टाने पाठवू शकतात. कागदपत्र घेऊन त्यांना बँकेत जाण्याची गरज नाही. याशिवाय ग्राहक व्हिडिओ केवायसी सुद्धा करू शकतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मे मध्ये देशात COVID-19 ची दुसरी लाट आणि विविध राज्यांत लागू प्रतिबंधामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) डिसेंबर 2021 पर्यंत बँका आणि इतर वित्तीय संस्थांना ग्राहकांविरूद्ध कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते.

 

जर केवायसी केले नाही तर काय होणार?
बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना नवीन केवायसी डॉक्युमेंटसह बँकेत जाऊन किंवा ऑनलाइन अपडेट करून ते पूर्ण करावे लागेल. बँकेचे म्हणणे आहे की, जर केवायसी पूर्ण केले नाही तर खात्यात भविष्यात करण्यात येणार्‍या व्यवहारांवर प्रतिबंध लावला जाऊ शकतो.

RBI चे KYC नियमांबाबत नियम
कोणत्याही बँकेत अकाऊंट उघडण्यासाठी केवायसीची आवश्यकता असते. रिझर्व्ह बँकेकडून हे अनिवार्य करण्यात आले आहे. केवायसी एक प्रकारची ग्राहकाची ओळख पटवण्याची प्रक्रिया असते, ज्यासाठी काही कागदपत्रे जमा करावी लागतात. जी कागदपत्रे जमा केली जातात त्यांना केवायसी कागदपत्रे म्हटले जाते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

RBI ने कोरोना संसर्ग पाहता नियमात बदलांची घोषणा केली होती.
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले होते की, सध्याचे कोरोना संकट पाहता केवायसी नियमात काही बदल करण्यात आले आहेत.
बँका यावर्षी 31 डिसेंबरपर्यंत केवायसी अपडेट नसल्यास खात्यातील व्यवहारांवर प्रतिबंध लावू शकणार नाहीत.

 

Web Title :- RBI | good news rbi extends deadline for kyc update by three months check details

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | नववर्षात सरकारी कर्मचार्‍यांच्या किमान वेतनात होणार मोठी वाढ! 35,510 रुपयांपर्यंत वाढणार

Post Office Saving Schemes | घरात मुल जन्माला येताच पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, 5 वर्षात मुल होईल ‘लखपती’ !

India Vs South Africa 2021 | ऐतिहासिक क्षण ! भारताने पहिला कसोटी सामना जिंकला; दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा

MPSC विरुद्ध लिहाल तर काही परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात येईल, आयोगाचा विद्यार्थ्यांना इशारा; विद्यार्थ्यांकडून संताप

 

Related Posts